नाशिकमध्ये महायुतीला झटका, अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळांनी असं का केलं?

लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटातील आमदार नरहरी झिरवळ शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Advertisement
Read Time: 1 min
नाशिक:

लोकसभा निवडणुकीपासून महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटातील आमदार नरहरी झिरवळ शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दिंडोरी लोकसभा निवडणुकीत नरहरी झिरवळ राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसून आले होते. नरहरी झिरवळ हे दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचार बैठकीत उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा एकदा नरहरी झिरवळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

नरहरी झिरवळ यांचा आज 19 जून रोजी वाढदिवस आहे. त्यांनी महाविकास आघाडीचे नाशिक शिक्षण मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वैयक्तिक कारणामुळे हा पाठिंबा जाहीर करीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. महायुतीला आणि अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. 

नक्की वाचा - 2 शिवसेना 2 वर्धापन दिन! शिवसेना 58 वर्षांची झाली पण...

दुसरीकडे आज झिरवळ यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती आणि सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. शरद पवार गटाचे नेते आणि खासदार भास्कर भगरे यांच्याकडून झिरवळांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. एकाच पोस्टरवर शरद पवार, भगरे आणि स्थानिक नेते श्रीराम शेटे यांचे फोटो असल्याने खळबळ उडाली आहे.