'राज'पुत्राविरोधात नरेंद्र मोदी मैदानात, शिवतीर्थावरील सभेत पंतप्रधान काय बोलणार?

लोकसभा निवडणुकीत ज्या शिवाजी पार्कातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्याच शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित ठाकरेंविरोधात सभा घेणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत ज्या शिवाजी पार्कातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आणि मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला त्याच शिवाजी पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित ठाकरेंविरोधात सभा घेणार आहेत. येत्या 14 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कात सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थासमोरील शिवाजी पार्कच्या (Mahim assembly constituency) मैदानात नरेंद्र मोदी अमित ठाकरेंविरोधात प्रचार करणार आहेत. 

महाराष्ट्रातील चुरशीच्या मतदारसंघात माहीम विधानसभेचा समावेश होतो. येथे महायुतीकडून सदा सरवणकर, मविआकडून महेश सावंत आणि मनसेकडून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अत्यंत नाट्यमय पद्धतीने येथील उमेदवारी ठरविण्यात आली. सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम राहिले. भाजपकडून अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू  होती. यासाठी भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठीही झाल्या होत्या. मात्र सदा सरवणकर आपल्या उमेदवारीवर ठाम राहिल्याने शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. सध्या माहीम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

नक्की वाचा - लेकासाठी 'राज' गर्जना! 'समोर कोणी असो, अमितला निवडून आणणारच'

यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवाजी पार्कात शड्डू ठोकणार आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला. मोदींच्या कामाचं कौतुक केलं. मात्र प्रत्यक्षात राजपूत्रासाठी मात्र महायुतीकडून पाठिंबा देण्यात आला नाही. उलटपक्षी त्याच्या विरोधात मोदी प्रचार करीत आहेत.  त्यामुळे विरोधात प्रचार करताना नरेंद्र मोदी मनसेवरही निशाणा साधणार का, हा सवाल उपस्थित केला जात आहे.