नाशिकमध्ये मोठी घडामोड; स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने घेतली भुजबळांची भेट

उद्या शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
नाशिक:

नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. अद्यापही नाशिक महायुतीचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान उद्या शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

शांतिगिरी महाराज उद्या शकितीप्रदर्शन करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असताना पूर्वसंध्येला त्यांच्या शिष्टमंडळाने छगन भुजबळ यांनी भेट घेतल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.  नाशिकच्या जागेबाबत महायुतीचा तिढा अद्याप कायम असतांनाच महायुती नेत्यांसोबतच्या बाबाजी परिवाराच्या बैठका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 

स्वामी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाची भुजबळ फार्मवर छगन भुजबळांसोबत बंद दाराआड 10 ते 15 मिनिटं चर्चा झाली.  

नक्की वाचा - आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

छगन भुजबळ नाशिक जागेसाठी इच्छूक होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी माघार घेतली. त्यामुळे युतीकडून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्यापही चर्चाच सुरू आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करून महिना उलटला तरीही अद्याप महायुतीतून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याचा तिढा सुटलेला नाही.