जाहिरात
Story ProgressBack

आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'

Read Time: 3 min
आधी पवारांचा झटका, आता फडणवीसांचा धक्का, माढ्यात 'पिक्चर अभी बाकी है'
माढा:

माढा लोकसभेत आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्टीव्ह झाले आहेत. शरद पवारांनी या मतदार संघात एकामागून एक दिलेल्या धक्क्यातून सावरण्यासाठी फडणवीस सरसावले आहेत. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी त्यांनी आता फासे टाकले आहेत. त्यांना त्यात यशही आले आहे. काँग्रेसचा एक बडा नेता फडणवीसांच्या गळाला लागला आहे. शिवाय हा नेता थेट मोहिते पाटील घराण्यातील असल्याने फडणवीसांनाही बळ मिळाले आहे. या नेत्याने भाजपला पाठींबा जाहीर करत भाजप प्रवेशाचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे माढ्याच्या निमित्ताने पवार फडणवीस कलगितूरा चांगलाच रंगला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा )

फडणवीसांच्या गळाला मोठा मासा 

धैर्यशिल मोहिते पाटील, त्यानंतर उत्तर जानकर यांनी भाजपची साथ सोडली आणि पवारांचा हात पकडला. हा भाजपसाठी आणि खास करून फडणवीसांसाठी मोठा धक्का होता. विदर्भातल्या निवडणुका आटपल्यानंतर फडणवीसांनी आपला मोर्चा थेट माढ्याकडे वळवला आहे. काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे फडणवीसांच्या गळाला लागले आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पाठींबा जाहीर केला आहे. शिवाय माळशिरस इथे होत असलेल्या फडणवीसांच्या जाहीर सभेत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. 

हेही वाचा -  स्वतःच्या मुलावर वेळ आली तेव्हा....'त्या' प्रकरणाचा दाखला देत रामदास कदमांनी ठाकरेंना घेरलं

कोण आहेत धवलसिंह मोहित पाटील? 

धवलसिंह मोहिते पाटील हे सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशिल मोहिते पाटील यांचे चुलत भाऊ आहे. माजी खासदार प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे ते पुत्र आहेत. एक मोहिते पाटील राष्ट्रवादीत गेल्याने दुसरे मोहिते पाटील फडणवीसांकडे आले आहेत. धवलसिंह मोहिते पाटील यांची माळशिरसमध्ये चांगली ताकद आहे. त्यांनी भाजपला पाठींबा जाहीर करणे हा धैर्यशिल मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्यासाठी धक्का समजला जातोय.  

माढ्यात आता पर्यंत काय काय घडलं?  

माढा लोकसभा निवडणुकीत एकामागून एक चक्रावून टाकणाऱ्या घडामोडी घडत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक घडामोडी या मतदार संघात रंगल्या. त्यात शरद पवार हे फडणवीसांवर वरचढ झाल्याचे दिसून आले. आधी पवारांनी महादेव जानकरांना या मतदार संघात उभे राहण्यासाठी तयार केले. जानकर पवारांच्या गळा लागणार अशी स्थिती असतानाच फडणवीसांनी फासे टाकत जानकरांना आपल्या तंबूत घेतले. जानकरांची रवानगी थेट परभणी लोकसभेत करण्यात आली. त्यानंतर पवारांनीही हार मानली नाही. तुम्ही एक जण घेतला मी दोघांना घेतो. असे म्हणत शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पक्षात घेतलेच. पण उत्तम जानकरांनाही आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले. एकामागू एक झटके लागल्याने भाजपमध्ये अस्वस्थेचे वातावरण होते. ही जागा अवघड आहे असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर ही करू टाकले. त्यानंतर आता माढ्यात फडणवीस अॅक्टीव्ह झाले आहेत. ते मोहित पाटलांचे गड असलेल्या माळशिरसमध्ये प्रचाराचा धडाका लावणार आहेत.   

डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination