Nashik News : 'माझा कार्यकर्ता' ठाकरेंच्या शहरप्रमुखांच्या घरात लग्न, शिंदे वऱ्हाडी! खिंडार पडणार?

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कन्येच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री फक्त या लग्नासाठी नाशिकमध्ये आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

प्राजंल कुलकर्णी, प्रतिनिधी

राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीत गळती सुरु असून त्या पक्षातील नेते महायुतीमध्ये दाखल होत आहेत. सत्तारुढ शिवसेनेनं (Shivsena Eknath Shinde) त्यांचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला लक्ष्य केलंय. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे इनकमिंग सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या कन्येच्या लग्नात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. ठाकरे सेनेचे नाशिक महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde, Nashik) यांच्या मुलीच्या लग्नाला शिंदे उपस्थित होते. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) केवळ विलास शिंदेंच्या कन्येच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नाशिकमध्ये आले होते.  

( नक्की वाचा : Gokul Milk : नाविद मुश्रीफ कसे बनले गोकुळचे अध्यक्ष? वाचा Inside Story )

'विलास, माझा कार्यकर्ता'

या कार्यक्रमासाठी काही तास आधी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीने ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे हे शिंदेंच्या शिवसेत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणात विलास शिंदे यांचा उल्लेख 'माझा कार्यकर्ता' असा केला. 

कार्यकर्त्यांच्या घरातील मंगल कार्य असेल तर त्याची इच्छा असते. विलास आमचा जुना कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचा विचार पुढं घेऊन जाणारा कार्यकर्ता आहे. राजकीय गणितं मांडण्याची गरज नाही आनंद सोहळा आहे मी सहभागी झालो. मनापासून शुभेच्छा शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.  

Advertisement
Topics mentioned in this article