Ajit Pawar Death : 'पायलटने Mayday कॉल दिला नाही,त्याला टेकऑफ नंतर..', विमान अपघाताचा नवा ट्वीस्ट समोर

अमोल मिटकरींनी अजित पवारांचा हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पायलटबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ajit Pawar Death Inside Story

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Ajit Pawar Plane Crash Latest Update : अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेबाबत दिवसेंदिवस आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान अपघाताबाबत शंका उपस्थित केल्या आहेत. मिटकरींनी अजित पवारांचा हा विमान अपघात नसून घातपात असल्याचा तीव्र संशय व्यक्त केला आहे. मिटकरींनी केलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

अमोल मिटकरी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

"VSR कंपनीचे पायलट दोन वेळा बदलले गेले.ती कंपनी आधीच नादुरुस्त होती. वर्षांभरापासून कंपनीवर बंदी होती आणि तेच विमान अजितदादांसाठी 28 तारखेला दिल्या जात आहे. दुसरीकडे,डिसेंबर 2025 च्या महिन्यात VSR कंपनीने आपल्या विमान कंपनीच्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयाचा विमा कंपनीने उतरवला.जर 50 कोटींचा विमा उतरवला गेला असेल, जो पायलट वेळेवर बदलला गेला असेल आणि त्याला हिप्नोटाइज केल होते का? त्याला आमिष दाखवलं होत कां?" असे प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत. 

नक्की वाचा >> Shadley Van Schalkwyk: वानखेडेत भारताचे 3 धुरंधर फलंदाज फेल,कोण आहे USA चा हुकमी एक्का? गोलंदाजाची जगभर चर्चा

"अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून सुसाईड बॉमरचा वापर केला जातो.अजमल कसाब याला दहशत वादी हल्ल्यासाठी पाठवल होतं.दुसरीकडे राजीव गांधी यांच्या हत्या झाली होती.त्यावेळी देखील असा प्रयत्न केला गेला होता.पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं कां? हा मोठा प्रश्न आहे. कारण पायलटने मे डे (MAYDAY) कॉल दिला नाहीये. टेकऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं. मात्र, तेही त्याने केलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला VSR कंपनीवर मोठी शंका आहे. 50 कोटींचा विमा काढून हे कृत्य करा लावलं कां? याचा सुद्धा तपास झाला पाहिजे", अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे.