भाजपनंतर राष्ट्रवादीतही खडसेंना नो एन्ट्री? रोहिणी खडसेंचाही पत्ता कट होणार?

खडसे यांची सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे सध्या कोणाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
जळगाव:

जेष्ट नेते एकनाथ खडसे यांची सध्या इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे सध्या कोणाचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपमध्ये प्रवेश करणार असं खडसेंनी जाहीर केलं होतं. पण त्यांचा पक्षप्रवेश काही झालाच नाही. प्रतिक्षा करूनही खडसेंच्या पदरात निराशाच पडली आहे. त्यामुळे अजून काही दिवस वाट पाहीन नाही तर मुळ पक्ष असलेल्या राष्ट्रवादीत पुन्हा जाईन असे वक्तव्य खडसे यांनी केले आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला आता जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला आहे. त्यात माजी मंत्री डॉ. सतिश पाटील हे आघाडीवर आहेत. त्यामुळे खडसेंचे नक्की काय होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपात पक्षप्रवेश होत नसल्यामुळे एकनाथ खडसे हे अस्वस्थ आहेत. त्यांनी अजून काही दिवस वाट पाहाणार आहे. नाही तर राष्ट्रवादीचेच काम नव्या जोमाने करणार असल्याचे खडसे यांनी जाहीर केलं आहे. पण एकनाथ खडसे हे पुन्हा राष्ट्रवादी येणार असतील तर त्याला आपला विरोध असल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत खडसे यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात काम केले. खडसे हे जर राष्ट्रवादीचे आहेत असं बोलत असतील तर त्यांनी आधी रावेरचे लोकसभा उमेदवार श्रीराम पाटील यांची माफी मागितली पाहिजे. अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी केली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - ठाकरेंचा नवा डाव, मुंबईत 22 जागांवर लढण्याची तयारी... वाचा संभाव्य यादी

पाटील यांनी खडसे यांच्या बाबत वक्तव्य करताना रोहिणी खडसे यांनाही विरोध दर्शवला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रोहिणी खडसेंना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्या मुक्ताईनगरमधून विधानसभेची निवडणूक लढू शकतात . त्यांची उमेदवारीही जवळपास निश्चित मानली जात आहे. असं असलं तरी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी ही उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे रोहिणी यांना उमेदवारी मिळेलच असे नाही असं वक्तव्यही सतीश पाटील यांनी केलं आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आरोग्य मंत्र्यांसाठी परांड्याची वाट बिकट? करेक्ट कार्यक्रम कोणाचा होणार?

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. त्यांना महसूल मंत्री असताना राजीनामा द्यावा लागला होता. यामागे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन होते असा खडसे यांचा आरोप होता. त्यामुळे पक्षा राहून त्यांनी वारंवार फडणवीस आणि महाजन यांना लक्ष केलं होतं. शेवटी त्यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. खडसे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवरही पाठवले होते. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खडसे यांनी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. आपला पक्षप्रवेश होणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. शिवाय लोकसभेला त्यांना रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता. पण त्यांचा पक्ष प्रवेश काही झाला नाही. त्यामुळे खडसे आता पुन्हा नाराज झाले आहेत.  

Advertisement