राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल आणि वॉट्सअप हॅक करण्यात आलं आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी त्यांच्या ट्वीटर वरून दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये 'माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी.' असं त्यांनी म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुप्रिया सुळे यांचा जनसंपर्क मोठा आहे. शिवाय त्या सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असतात. कार्यकर्त्यांचे मोबाईलवर येणारे फोन आणि मेसेजलाही त्या आवर्जून रिप्लाय करत असतात. मात्र त्यांचा फोन आणि वॉट्सअप हॅक झाल्याचे त्यांना रविवारी दुपारी लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती सोशल मीडियावरून आपल्या कार्यकर्त्यांना दिली आहे.
याबाबत त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून सर्व कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्या त्यांनी माझा मोबाईल हॅक झाला आहे. शिवाय वॉट्सअपही हॅक झाले आहे. त्यामुळे कोणीही फोन किंवा वॉट्सअप करू नये. मेसेजही करू नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे.शिवाय याबाबत आपण पोलिसांना तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. खासदार व्यक्तीचा मोबाईल हॅक होणे ही गंभीर बाब मानली जात आहे. हा मोबाईल कोणी हॅक केला याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे.