NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल? भाजप नेत्याने केलं अभिनंदन, पण सत्य काय

एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा
  • केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेतले होते
  • पटेल यांनी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्तीबाबतच्या अफवा पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार याची चर्चा सुरू झाली होती. त्यात उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबतही बोललं जात होतं. मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन त्या चर्चांना पुर्ण विराम दिला आहे. असं असलं तरी राष्ट्रीय अध्यक्षाचं काय असा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे एक विधान चर्चेत आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाबाबत प्रतिक्रीया दिली. त्यामुळे पटेल राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरली. त्यावर आता पटले यांनीच खुलासा केला आहे. त्यांनी याबाबत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दलच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात आहेत. या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यात काहीही तथ्य नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी 'एक्स पोस्ट' द्वारे दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा लोकशाही तत्त्वांवर चालणारा पक्ष असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी, आमदारांशी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तसेच आमच्या सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करूनच याबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही प्रफुल पटेल यांनी सांगितले. असं सांगत त्यांनी या चर्चेवर ही पुर्ण विराम दिला आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, अशा बाबींमध्ये आम्ही विहित प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करतो असा स्पष्ट खुलासाही प्रफुल पटेल यांनी एक्स पोस्टमध्ये केला आहे. दरम्यान त्या आधी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पटेल यांच्या अध्यक्षपदाबाबत विधान केले होते. मात्र त्यांनी ही आता आपले विधान मागे घेतले आहे. ते म्हणाले की राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत आपण जे काही वक्तव्य केले त्याचा आपल्याला खेद आहे असं ते म्हणाले. आपल्याला एका वरिष्ठ पत्रकाराने चुकीची माहिती दिली होती असंही ते म्हणाले. 

नक्की वाचा - Hingoli News: आधी चाकूने भोकसले, मग दगडाने ठेचले, भर दिवसा खतरनाक हल्ला, घटना CCTV त कैद

गोयल यांनी आपल्या एक्स पोस्टवर याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की एका वरिष्ठ पत्रकाराने मला चुकीची माहिती पुरवली होती. त्याने सांगितले की प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. आपण ही कोणती ही खात्री न करता माध्यमामध्ये याबाबत वक्तव्य केले. मात्र त्यानंतर समजले की मला दिलेली माहिती ही चुकीची आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली काम करत आहे असं गोयल यांनी स्पष्ट करत आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला आहे.