जाहिरात

Hingoli News: आधी चाकूने भोकसले, मग दगडाने ठेचले, भर दिवसा खतरनाक हल्ला, घटना CCTV त कैद

काल दुपारच्या वेळी वर्दळ असणाऱ्या रेल्वे स्टेशन समोर हा हल्ला झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे.

Hingoli News: आधी चाकूने भोकसले, मग दगडाने ठेचले, भर दिवसा खतरनाक हल्ला, घटना CCTV त कैद
  • हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनसमोर दिवसाढवळ्या एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला
  • आदित्य सूर्यवंशी या युवकाला तीन आरोपींनी धारदार खंजिराने सपासप वार केले
  • हल्ला किरकोळ वादातून झाला असून जखमी युवक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे आणि पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
हिंगोली:

समाधान कांबळे

पोलीसांचा धाक आहे की नाही? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन समोर दिवसाढवळ्या एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्लाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत ही कैद झाली आहे. या व्हिडीओ पाहिल्यानंतर माणूस इतका क्रुर कसा असू शकतो असं प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेनंतर शहरात दहशतीचे वातावरण आहे.  

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

या हल्ल्यात आदित्य सूर्यवंशी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून आदित्यला तीन युवकांनी धारदार खंजिराने त्याच्यावर वार केले. त्याच्या पोटात खंजीराने सपासप वार केले. त्यातीलच एका युवकाने दगडाने देखील गंभीर मारहाण केली आहे. हे सर्व सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. मारताना त्या तरुणाचा जीव जाईल याची ही चिंता हल्लेखोरांना नव्हती. 

नक्की वाचा - Income Tax: आता उत्पन्न लपवलं तर जेल नाही; टॅक्स रिटर्नसाठीही मिळणार जास्त वेळ, वाचा बजेटमधील मोठे निर्णय

काल दुपारच्या वेळी वर्दळ असणाऱ्या रेल्वे स्टेशन समोर हा हल्ला झाल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. या जीवघेण्या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. याप्रकरणी प्रथम कुऱ्हे, विकास खंदारे व अरबाज या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी युवकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिस आरोपींच्या शोध घेत आहेत. दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या अशा हल्ल्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरली का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com