NCP News:'जयंत पाटलांनी आम्हाला डोळा मारला तर...' राष्ट्रवादीच्या नेत्याचे स्पष्ट संकेत

गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली. त्यानंतर पक्षातले अनेक दिग्गज हे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांच्या तंबूत गेले. पण अशा स्थितीत ही जयंत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. जयंत पाटील हे शरद पवारांची साथ सोडणार अशी वावड्या ही उठल्या होत्या. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या ही येत होत्या. पण जयंत पाटील यांनी अजून तरी शरद पवारांची साथ सोडली नाही. जयंत पाटील यांच्या सारखा नेता आपल्या पक्षात यावा यासाठी सध्या रस्सीखेच दिसत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यातूनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे सगळ्याच पक्षातील लोकांना डोळा मारतात. जयंत पाटील यांनी डोळे मारणे आता बंद करावे. एकालाच कोणाला तरी डोळा मारावा. आम्हाला डोळा मारणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू. अशी मिश्किल टिपणीसुरज चव्हाण यांनी केली आहे. त्यामुळे अजित पवार गट अजूनही जयंत पाटील यांच्याबाबत आशावादी आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपत्रातील 10 ठळक मुद्दे

गेल्या काही दिवसापासून जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशावर थेट भाष्य केले आहे. तसेच, माळशिरस येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर हे आपली आमदारकी वाचवण्यासाटी ईव्हीएमचे अस्त्र पुढे करत आहेत. त्यांच्याकडे जातीचा खोटा दाखला आहे. त्यामुळे आमदारकी रद्द होईल अशी त्यांना भीती असल्याने ते ईव्हीएमचे कारण पुढे करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

ट्रेंडिंग बातमी - Petrol Pump Business: पेट्रोल पंप सुरु करायचा आहे? मग तयारीला लागा; 'या' निर्णयामुळे अर्ज करणे झाले सोपे

Advertisement

सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सध्या जिल्हाध्यक्ष नाही. पक्षाचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. अशा परिस्थितीत लवकरच अजित पवार नावाचे डॉक्टर सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन करतील. अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतील. असा दावा यावेळी सुरज चव्हाण यांनी केला. त्यामुळे ते नेते कोण याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील 50% युवकांना संधी देण्याचे धोरण ठरले आहे. याबाबत आपण अजित पवारांकडे मागणीही केली आहे. असेही त्यांनी सांगितलं.