जाहिरात

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रातील 10 ठळक मुद्दे

Santosh Deshmukh Murder Case Update: मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलीसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्येचा मुख्य सूत्रधार! आरोपपत्रातील 10 ठळक मुद्दे

बीड: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या मस्सजोगचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सीआयडीकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या आरोपपत्रांमध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट होणार असल्याचे बोलले जात होते. याचसंदर्भात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलीसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच पहिला आरोपी असून त्यानेच हा कट रचून हत्या घडवल्याचे या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. 

महत्त्वाचे म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी, आणि अट्रॉसिटी प्रकरण असे तिनही गुन्हे एकत्रित करुन हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे सर्व गुन्हे संलग्न असून एकमेकांशी संबंधित असल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादातूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. 

(नक्की वाचा-  Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)

सुत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांकडून दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा एक नंबरचा आरोपी आहे, विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमाकांचा आरोपी आहे तर सुदर्शन घुले तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल प्रतिक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, तसेच फरार कृष्णा आंधळेचे नाव टाकण्यात आले आहे.

 धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओही सीआयडीच्या हाती लागल्याचीही माहिती सुत्रांनी दिली असून तसा दावा या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या आरोपपत्राच्या आधारे वाल्मिक कराडचा फास आवळण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता या प्रकरणी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, अशी आशा धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे. 

(नक्की वाचा - Swargate case: 'मला पोलिसांनी सांगितलं तेच मी बोललो', योगेश कदम परत फसणार?)

चार्जशीटमधील महत्त्वाचे मुद्दे...

  1. आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादानंतर हत्या झाली
  2. आवादा पवनचक्की प्रकल्पाचा प्रोजेक्ट मॅनेजर सुनील केंदू शिंदे यांना वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन दोन कोटी रुपयांची खंडणी माहितली.
  3. 29 नोव्हेंबरला सुदर्शनच्या फोनवरून वाल्मीक कराडने  मागितली होती खंडणी.
  4.  सहा डिसेंबर रोजी देशमुखांच्या गावामध्ये सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सांगळेंशी आवादा पवनचक्की प्रकल्पावर वाद घडला.
  5. पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतर कराडविरुद्ध मिळाले सबळ पुरावे.
  6. खंडणी ॲट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोप पत्रात एकत्रित उल्लेख.
  7. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले मारहाण करतानाचा व्हिडिओही सीआयडीच्या हाती
  8. आरोपी क्रमांक एक वाल्मीक कराड 
  9. आरोपी क्रमांक दोन विष्णू चाटे
  10. आरोपी क्रमांक तीन सुदर्शन घुले
  11. आरोपी क्रमांक चार प्रतीक घुले
  12. आरोपी क्रमांक पाच सुधीर सांगळे 
  13. आरोपी क्रमांक सहा महेश केदार
  14. आरोपी क्रमांक सात जयराम चाटे 
  15. आरोपी क्रमांक आठ फरार कृष्णा आंधळे 
  16. नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचे नाव वगळण्यात आले आहे

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: