'अजित पवार परत या, परत या...' भरसभेत त्याने बॅनर फडकवला, पुढे काय झालं?

अजित पवार परत या, परत या, परत या राष्ट्रवादीत परत या... केवळ तो फलक फडकावून थांबला नाही तर तो जोरजोरात ही घोषणा देत होता.

Advertisement
Read Time: 3 mins
पुणे:

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सध्या जन सन्मान यात्रा सुरू आहे. ही यात्रा सध्या मावळात आहे. इथे अजित पवारांची जाहीर सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांने अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच एक फलक फडकवला. त्यावर लिहीले होते अजित पवार परत या, परत या, परत या राष्ट्रवादीत परत या... केवळ तो फलक फडकावून थांबला नाही तर तो जोरजोरात ही घोषणा देत होता. त्यावेळी अजित पवारांना आपले भाषणमध्येच थांबवावे लागले. मी तुलानंतर भेटतो असं म्हणत त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. मात्र या घटनेनंतर अजित पवार शरद पवारांकडे परतणार का? याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

राष्ट्रवादीचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आज अजित पवारांना भिडला.  त्याने अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच त्यांना भावनिक साद घातली. अजित दादा परत या. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत या. यावेळी त्याला सुरक्षा रक्षकाने रोखले. तो ओरडत असताना अजित पवारांनीही त्याची दखल घेतली. मी तुला भेटतो असे त्यांनी सांगितले. सभा संपल्यानंतर या तरूणाने आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे सांगितले. विकासाची कामेही शरद पवार आणि अजित पवार यांनी केली आहे. जर हा विकासाचा झंझावात टिकायचा असेल तर शरद पवार अजित पवारांनी एकत्र काम केले पाहीजे असे त्याने सांगितले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - उद्धव ठाकरे यांचं शरद पवार, नाना पटोलेंसमोरच मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्याने कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे असंही तो म्हणाले. हे नुकसान पुढे ही होणार आहे. त्यामुळे वेळीच एकत्र येण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. हा तरूण कार्यकर्ता राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही राहीला आहे. शिवाय त्यांनी विद्यार्थी संघटनेतही काम केले आहे. अजित पवार जाहीर सभेत भेटतो असे म्हणाले, पण त्यांची भेट झाली नाही. त्यांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं असं हा तरूण म्हणाला. पण आपण अजित पवारांची याबाबत भेट घेणार असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा', उद्धव ठाकरेंच्या मागणीमागचं राजकारण काय?

अजित पवार शरद पवारांकडे परत जाणार का, याची चर्चा नव्यानं सुरू झाली आहे.  त्याला कारण ठरली अजित पवारांनी एएनआयला दिलेली मुलाखत. या मुलाखतीत शरद पवारांकडे परत जाण्याबद्दल अजित पवारांनी नो कमेंट्स असं म्हटले होते. याच अर्थ आता लावला जात आहे. महायुतीबरोबरच लढणार असं याच मुलाखतीत अजित पवार म्हणाले.मात्र पवारांकडे परत जाणार नाही, हे ठामपणे दादांनी सांगितलं नाही. शिवाय सुनेत्रा पवारांना सुप्रियांविरोधात उभं करणं ही चूक होती, तसंच कुटुंबात राजकारण फार आणू नये, असं दादांना आता वाटू लागलं आहे. जे शिवसेना सोडून गेले, त्यांना दारं बंद अशी ठाम भूमिका ठाकरेंनी घेतलीय. मात्र राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांबद्दल पवारांनी अशी भूमिका घेतलेली नाही. उलट अटी शर्तींसह पवारांनी दरवाजे उघडे ठेवलेत. त्यामुळे अजित पवारांच्या परतीचे वेध कार्यकर्त्यांनाही लागले आहेत. 

Advertisement