मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? जयंत पाटलांचं थेट उत्तर

उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत असताना आता आणखी एका इच्छुकाची भर त्यात पडली आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
मुंबई:

सागर कुलकर्णी 

महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली. महायुतीला चारीमुंड्या चित केलं. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. उद्धव ठाकरे हे दिल्लीत आहेत. राज्यात जागा वाटपाची प्राथमिक चर्चाही सुरू आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होणार असा विश्वास महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. एकीकडे अशी स्थिती असताना दुसरीकडे मात्र मविआमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुकांची संख्या वाढत चालली आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे यांची नावे चर्चेत असताना आता आणखी एका इच्छुकाची भर त्यात पडली आहे. ती म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. त्यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली इच्छा व्यक्त केली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुख्यमंत्री होण्याची इच्छा 

राज्यात सत्ताबदल करणे हे महाविकास आघाडीचे उद्दीष्ठ आहे. निवडणुकीला सामोरे जात असताना राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणुका लढल्या जाणार आहेत असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. सत्ता येण्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. ज्याच्याकडे जास्त आकडे असतील त्याचा मुख्यमंत्री होवू शकतो. या आधी राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही मुख्यमंत्रीपद घेतले नव्हते. तो शरद पवारांचा परिस्थिती नुसार निर्णय होता. मात्र प्रत्येक वेळी तसेच होईल असे नाही असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. राजकारणात असणाऱ्या प्रत्येकाला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते. तशी इच्छा माझी ही आहे अशी कबुली जयंत पाटील यांनी दिली आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - पवार विरहीत राजकारणाचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न ? दूरदृष्टी ठेवत दिल्ली दौऱ्याची आखणी

लोकसभेला कमी जागा लढलो पण... 

लोकसभेत महाविकास आघाडी म्हणून लढलो. पण त्यावेळी राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा आल्या. आमचा स्ट्राईक रेट हा चांगला होता. अनेक ठिकाणी आघाडीच्या धर्मासाठी माघार घेतली असेही जयंत पाटील म्हणाले. राज्यात राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यानुसारच आगामी विधानसभा निवडणुकीत जागा मिळाल्यात हा आमचा प्रयत्न असेल असे जयंत पाटील म्हणाले. सत्ता मिळवायची असेल तर निवडून कोण येतो याला जास्त महत्व आहे. त्यामुळे समजूतदार पणे सर्वच जण घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

Advertisement

हे ही वाचा: ठाकरेंनी दिल्लीत डाव टाकला, मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान

आमच्या सोबत कार्यकर्ते 

जयंत पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले, की आमच्या सोबत नेते नाहीत. पण आमच्या सोबत सर्व सामान्य कार्यकर्ता नक्कीच आहे. आता काही जण इव्हेंट मॅनेटमेंट करत आहे असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या जन सन्मान यात्रेवर टिका केली आहे. आमचीही यात्रा होत आहे. पण ती साधे पणाने असेल. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवस्वराज्य यात्रा निघणार आहे. त्यामध्ये बडेजाव पणा नसेल. अचानक काही नेते विकासावर बोलत आहेत. ते जनतेच्या पचनी पडत नाही असा टोलाही त्यांनी अजित पवार यांना यावेळी लगावला आहे.   

Advertisement

( नक्की वाचा : 1500 वर्ष जुन्या मंदिरासह संपूर्ण गावावर केला होता Waqf Board नं दावा! काय आहे प्रकरण? )

आमची स्पर्धा अजित पवारांशी नाही तर... 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची स्पर्धाही अजित पवारां बरोबर मुळीच नाही. तर ही स्पर्धा थेट भाजप बरोबर असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मी पक्ष सोडणार हे बदनाम करण्यासाठी विरोधक बोलत होते असे पाटील म्हणाले. भाजपमध्ये माझे हितचिंतक नक्कीच आहेत. पण शरद पवारांना कधीही सोडणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणूकीत जनतेने महायुतीला धडा शिकवला आहे. त्यांच्याच नेत्यांनी संविधान बदलण्याची वक्तव्ये केली होती. तेच आम्ही जनतेला सांगितले असे ते म्हणाले. 

( नक्की वाचा : वक्फ बोर्डाच्या 'अनिर्बंध' अधिकारांवर गंडांतर, मोदी सरकारचं मोठं पाऊल )

'तर भाजरचं सरकार आलं असतं' 

भाजपने दोन पक्ष फोडले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांना पक्षात घेतले. त्यांच्या विरोधातल्या ईडी, सीबीआय, आयटीच्या चौकश्या लगेच थांबल्या. ही भाजपची मोठी चुक होती. त्यामुळेच लोकसभेला त्यांना जनतेने नाकारले. भाजप जर विरोधी पक्षात राहीला असता तर कदाचित ते स्वबळावर सत्तेत आले असते असेही जयंत पाटील म्हणाले. पण फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली असं त्यांनी सांगितलं. 

जे सोडून गेले ते... 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जे भाजप बरोबर गेलेत त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार आहे. त्यामुळे सत्ता गेली तरी त्यांना भाजपला सोडता येणार नाही हे  स्पष्ट आहे. त्यामुळे अजित पवारांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्नच उद्धवत नाही असेही ते म्हणाले. शिवाय जरी कोणाला घ्यायचे असेल तर सरसकट सर्वांना पक्षात घेणार नाही असेही त्यांनी सांगितले. विधानसभेत पक्ष सर्व सामान्य तरूण आणि नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. पक्षाची नव्याने बांधणी करत आहोत. शिवाय पक्षाच्यावतीन शिव स्वराज्य यात्रेचे आयोजन ही करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाला त्यातून नवं बळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.