'मी विधानसभेत दिसणार' निलेश राणेंच्या घोषणेनं कोणाचा पत्ता कट होणार?

काही झालं तरी विधानसभे जाणार असं वक्तव्य निलेश राणे यांनी केलं आहे. मात्र कोणत्या मतदार संघातून ते निवडणूक लढणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

जाहिरात
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपचे नारायण राणे हे विजयी झाले. त्यानंतर आता राणे कुटुंब विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. नारायण राण  हे विद्यमान खासदार आहेत. तर नितेश राणे हे कणकवली देवगड मतदार संघाचे आमदार आहे. त्यात आता राणे कुटुंबातील आणखी एक सदस्य निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. ते म्हणजे माजी खासदार निलेश राणे. त्यानी तसे थेट वक्तव्यच केले आहे. यावेळी निलेश राणे विधानसभेत दिसणार असे सांगत, विधानसभा निवडणूक लढवण्यारच असे त्यांनी सांगितले. मात्र कोणत्या मतदार संघातून ते लढणार हे अजूनही स्पष्ट नाही. मात्र त्यांच्या निवडणूक लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीत आणि भाजप अंतर्गतही अनेक अडचणी येवू शकतात अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निलेश राणे हे माजी खासदार आहेत. ते रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून एकदा विजयी झाले आहेत. तर दोन वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता ते विधानसभेची तयारी करत आहेत. ते कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून तयारी करत आहेत. हा मतदार संघ तसा शिवसेनेचा आहे. त्यामुळे जागा वाटपात तो भाजपसाठी सुटेल का हा खरा प्रश्न आहे. लोकसभेला शिवसेना शिंदे गटाने आपल्या कोट्यातली जागा नारायण राणे यांच्यासाठी सोडली. त्यानंतर कुडाळ मालवणचीही जागा शिंदे राणेंसाठी सोडणार का? यावर निलेश राणे यांचे भवितव्य अवलंबून आहे. जर ही जागा शिंदेंनी सोडली नाही तर निलेश राणे यांना पर्यायी मतदार संघ शोधावा लागणार आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - वरिष्ठाने सुट्टी नाकारली, 30 वर्षांच्या महिलेचा ऑफिसमध्येच मृत्यू

मतदार संघ जरी सुटला तरी एकाच कुटुंबातील किती जाणांना संधी द्यायची हा मुद्दा उपस्थित होत आहे. सध्या नारायण राणे हे खासदार आहेत. तर नितेश राणे हे विद्यमान आमदार आहे. अशा वेळी आणखी एक पद घरात द्यायचे का याचा विचार भाजप नेतृत्वाला करावा लागणार आहे. घराणेशाही विरोधात नेहमीच भाजपमध्ये बोलले जाते. अशा वेळी एकाच घरात तीन पदे देणार का? हा प्रश्न आता भाजप नेतृत्वापुढे निर्माण झाला आहे. शिवाय स्थानिक भाजप पदाधिकारीही सर्वच राणेंना देणार तर मग आम्हाला काय असा प्रश्न उपस्थित करत आहेत. जे निष्ठावंत भाजप कार्यकर्ते आहेत त्यांची मात्र यात घुसमट होत असल्याचीही चर्चा आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आई, वडील, भाऊ... रक्तासाठी रात्रभर पळापळ; पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपींचा 'कार'नामा उघड

या सर्व गोष्टी पाहात निलेश राणे यांनी यावेळी शंभर टक्के विधानसभेत जाणार असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. निलेश राणे यांना जर उमेदवारी मिळणार असेल तर ती भाजपची असेल की शिवसेना शिंदे गटाची हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. निलेश राणे हे कुडाळ मालवण मतदार संघात तयारी करत आहेत. इथे ठाकरे गटाचे वैभव नाईक सध्या आमदार आहेत. हा मतदार संघ शिवसेनेचा आहे. त्यामुळे इथून शिंदे ही जागा सोडणार का हा खरा प्रश्न आहे. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून राणे यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे निलेश राणे यांचा विश्वास वाढला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - रक्ताच्या नमुन्याची आदला-बदली की अजून काही? पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाचा नवा अँगल

निलेश राणे यांनी विधानसभेत काही झालं तरी जाणार असं वक्तव्य केलं आहे. मात्र कोणत्या मतदार संघातून ते निवडणूक लढणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. ते त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असंही त्यांनी सांगितले. सध्याची सिंधुदुर्गची स्थिती पाहात इथे तिन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यातला एक भाजपच्या ताब्यात तर एक शिंदे शिवसेनेकडे तर एक ठाकरे सेनेकडे आहे. त्यामुळे निलेश राणे यांना निवडणूक लढवायची असल्याच कुडाळ मालवण हाच एकमेव पर्याय आहे. किंवा त्यांना कोकणातला अन्य मतदार संघ निवडावा लागेल अशी स्थिती आहे.