पुण्याला जाण्यासाठी आता 14 लेनचा रस्ता, अटल सेतूला जोडणार, गडकरींचा प्लॅन काय?

अटल सेतूजवळ 14 लेनचा रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला आणि नंतर रिंगरोडमार्गे बेंगळुरूला जोडला जाईल.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला नावा प्लॅन काय आहे ते सांगितलं आहे. रिंगरोडमार्गे पुण्याला जोडणाऱ्या अटल सेतू सागरी सेतूजवळील नवा 14 लेन रस्ता प्रस्तावीत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक 50 टक्क्यांनी कमी होईल असे ही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सीओईपी टेक्नॉलॉजि युनिव्हर्सिटीने अभियंता दिनानिमित्त आयोजित केलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जड वाहतूक आहे. त्यामुळे अटल सेतूजवळ 14 लेनचा रस्ता तयार केला जाईल. जो पुढे पुण्याला आणि नंतर रिंगरोडमार्गे बेंगळुरूला जोडला जाईल. या रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक त्यामुळे 50 टक्क्यांनी कमी होईल असे ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न नाही' ठाकरेंनी माघार का घेतली? थेट कारण सांगितलं

अटल सेतू हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. तो मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईला जोडतो. नितीन गडकरी यांनी सांगितले की  ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे. येत्या 25 वर्षांत सर्व वाहने जीवाश्म इंधनावर नाही तर विजेवर चालतील. आपले तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. शिवाय कचऱ्याचा वापर आपण रस्ते बांधण्यासाठी करू शकतो असं ही ते म्हणाले. नवीन रस्ते तयार करण्यासाठी  80 लाख टन कचरा वापरण्यात आला आहे. या क्षेत्रातील संशोधकांना त्यासाठी भरपूर वाव आहे, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. 

Topics mentioned in this article