पंकजा मुंडे विधानपरिषदेवर, भाजपाकडून 5 जणांना उमेदवारी जाहीर

Pankaja Munde : भारतीय जनता पक्षानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Pankaja Munde
मुंबई:


Pankaja Munde : भारतीय जनता पक्षानं विधानपरिषदेसाठी 5 जणांची यादी जाहीर केली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. पंकजा मुंडेंसह परिणय फुके, अमित बोरखे, योगेश टिळेकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर सातत्यानं त्यांचं राजकीय पूनर्वसन करण्यात यावं अशी मागणी पंकजा समर्थकांकडून करण्यात येत होती. यावर्षी झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत पंकजा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पराभव केला होता. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवसेनेला धक्का

येत्या 12 जुलै रोजी विधानपरिषदेसाठी (Legislative Council elections) मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभा संख्येनुसार भाजपा पाचा जागा लढवू इच्छितो. तर एकनाथ शिंदे शिवसेना आणि एनसीपी अजित पवार प्रत्येकी दोन जागा, असं गणित आहे. पण, शिवसेनेनं भाजपाच्या कोट्यातील एक जागा मागितली होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली भाजपा नेत्या सोबत संवाद करून भाजपा कोट्यातून एक जागा मिळावी अशी  अपेक्षा व्यक्त  केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण, भाजपानं शिवसेनेला धक्का देत पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. 

Advertisement

( नक्की वाचा : 'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral )

विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार (2 जुलै) हा शेवटचा दिवस आहे. 16 जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे.

कसा असेल निवडणुकीचा कार्यक्रम?


25 जून - अधिसूचना जारी
2 जुलै - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
3 जुलै - अर्ज छाणणी
5 जुलै - अर्ज मागे घेण्याची तारीख
12 जुलै - मतदान (सकाळी 9 ते दुपारी 4)
12 जुलै - मतमोजणी (संध्याकाळी 5 वाजता

Advertisement