PM Modi Video: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी झारग्राममध्ये एका छोट्या स्टॉलवर थांबून भेळचा (झालमुरी) आस्वाद घेतला. हा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खुद्द देशाचे पंतप्रधान आपल्या दुकानात येऊन भेळ खातात, हे पाहून दुकानदार विक्रम शॉ याचा आनंद गगनात मावत नव्हता. पण आता याच विक्रम शॉने एक अशी खंत व्यक्त केली आहे, ज्यामुळे ही चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
पंतप्रधानांसोबतच्या भेटीत नक्की काय घडले?
पंतप्रधान मोदी यांनी केवळ भेळ खाल्ली नाही, तर विक्रम शॉ याच्याशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली आणि भेळच्या चवीचे कौतुकही केले. पंतप्रधानांचा हा साधेपणा पाहून विक्रम शॉ प्रचंड भावुक झाला होता. पण नेमक्या याच उत्साहाच्या भरात आणि गोंधळलेल्या मनस्थितीत त्याने एक मोठी चूकही केली.
विक्रम शॉ यांना आता कशाची खंत?
पंतप्रधान मोदी तिथून निघून गेल्यावर विक्रम शॉ याला एका गोष्टीची तीव्र खंत वाटू लागली ती म्हणजे त्याने पंतप्रधानांचा ऑटोग्राफ मागितला नाही. विक्रम त्यावेळेस इतका भावुक झाला होता, गोंधळून गेला होता की, त्याला काहीच सुचले नाही.
(नक्की वाचा: Pune Breaking: पुणे हादरले! सुप्रसिद्ध लेखक डॉ. संपत जाधव यांना पिस्तुल दाखवून हल्ल्याचा प्रयत्न, मातंग समाजाच्या बैठकीनंतर राडा) पंतप्रधान नरेंद्र मोदी भेळचा आस्वाद घेतानाचा व्हिडीओ मूळचा बिहारमधील गया येथील रहिवासी असलेला विक्रम शॉ म्हणाला की, गरिबीमुळे त्याला इयत्ता नववीतच शिक्षण सोडावे लागले. दररोज 1000 हजार ते 1200 रुपयांची कमाई करणाऱ्या विक्रम शॉसाठी मोदींनी स्वतःहून भेळची किंमत विचारून पैसे देण्याचा आग्रह करणे, हा क्षण त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय ठेवा बनला आहे, पण ऑटोग्राफची संधी हुकल्याचे त्याला दुःख आहे.