PM Modi Lok Sabha Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच विरोधकांनी गोंधळ सुरु केला. मोदींनी या भाषणात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारलेले प्रश्न आणि केलेल्या आरोपांना उत्तरं दिली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तृष्टीकरण नाही संतुष्टीकरण
पंतप्रधान मोदींनी या भाषणात तृष्टीकरणाच्या राजकारणावर जोरदार हल्ला केला. 'या देशानं बऱ्याच काळापासून तृष्टीकरणाचं राजकारण पाहिलं आहे. तृष्टीकरणाचं गव्हर्नंस मॉडल देखील पाहिलं आहे. आम्ही तृष्टीकरण नाही तर संतुष्टीकरणाचा विचार घेऊन मार्गक्रमण करत आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाचा लाभ पोहोचणे ही आमच्या दृष्टीनं संतुष्टीकरणाची व्याख्या आहे. देशानं आम्हाला तिसऱ्यांदा पसंती दिली आहे. तृष्टीकरणानं देशाचं नुकसान केलं आहे. आम्ही 'जस्टीस टू ऑल, अपीजमेंट टू नन' या तत्वावर मार्गक्रमण करतं. आमची निती आणि वृत्तीवर लोकांनी विश्वास ठेवला आहे. '
'काही लोकांचा त्रास समजू शकतो
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'हे जगातील सर्वात मोठे निवडणूक अभियान होते. देशातील जनतेनं या सर्वात मोठ्या निवडणूक अभियानातून आमची निवड केली. मी काही जणांचा त्रास समजू शकतो. सतत खोटं बोलल्यानंतरही त्यांचा मोठा पराभव झाला आहे.'
( नक्की वाचा : 'हिंदूं'वरुन गांधी-मोदींमध्ये खडाजंगी, लोकसभेत नेमकं काय झालं? )
राहुल गांधी काय म्हणाले होते?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी हिंदुत्व, अयोध्या, जम्मू काश्मीर, अग्नीवीर यासह अनेक योजना तसंच महत्त्वांच्या मुद्यांवर भाजपाला लक्ष्य केलं होतं. राहुल यांनी भाजपा देशात हिंसा, द्वेष आणि भीती पसरवत असल्याचा आरोप केला होता. ही लोकं हिंदू नाहीत, असा दावा राहुल यांनी केला. त्याला सत्तारुढ पक्षांच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभं राहून या भाषणात हस्तक्षेप केला. संपूर्ण हिदू समाजावर हिंसक असं लेबल लावणं हे खूप गंभीर आहे, असं मोदींनी सांगितलं होतं.