Prajakta Mali : 'काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना...'; प्राजक्ता माळीसाठी पंकजा मुंडेही सरसावल्या!

अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लोकप्रतिनिधींनी महिलांना टार्गेट केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सिने क्षेत्रातील कलाकार मंडळी तिच्या पाठिशी उभी राहिली आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत लोकप्रतिनिधींनी महिलांना टार्गेट केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. 

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची राज्यभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणाविषयी बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीसह अनेक अभिनेत्रींचा उल्लेख केला. यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत घडलेल्या घटनेचा खेद व्यक्त केला आणि सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या प्रकरणात महिला आयोगाकडे तक्रार केल्याचंही सांगितलं जात आहे. 

Advertisement

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या प्रकरणानंतर मराठी कलाकार प्राजक्ताच्या समर्थनार्थ पुढे आले. त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत प्राजक्ताला पाठिंबा दिला. दरम्यान बीड आणि परळीबद्दलचा मुद्दा सुरू असताना भाजपतील महिला नेत्या पंकजा मुंडेंनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद पाहवली नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. स्त्री नेहमी सॉफ्ट टार्गेट होते, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  

Advertisement

नक्की वाचा - Prajakta Maliसाठी मराठी कलाकार एकवटले, #iamwithprajaktamali सोशल मीडियावर नवा ट्रेंड

पंकजा मुंडेंची पोस्ट चर्चेत...
'शक्ती' शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही.. त्रिदेव ही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे.. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची.. 'दुर्दैवी घटना'हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे.. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना पण कायद्याने ,नियमाने !! ते राहिले बाजूला नुसती चिखल फेक..दुर्दैवाने soft target आहे स्त्री आणि तिचे सत्व...काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all

Advertisement