जाहिरात

Prajakta Maliसाठी मराठी कलाकार एकवटले, #iamwithprajaktamali सोशल मीडियावर नवा ट्रेंड

'प्राजक्ता माळी... मी तुझ्यासोबत आहे..!'

Prajakta Maliसाठी मराठी कलाकार एकवटले, #iamwithprajaktamali सोशल मीडियावर नवा ट्रेंड
मुंबई:

भाजप आमदार सुरेश धस यांनी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडेंवर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचा उल्लेख केल्यानंतर संतापलेल्या प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत आपला राग व्यक्त केला. गेल्या दीड महिन्यापासून हा सर्व प्रकार सुरू होता, मात्र आता लोकप्रतिनिधींनी माझ्या नावाचा उल्लेख केल्यानं पत्रकार परिषद घेत असल्याचं प्राजक्ताने सांगितलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अशा प्रकारची वक्तव्य करून महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्न उपस्थित केला जात असल्याचं प्राजक्ताने कुटुंबासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. तिच्या या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाकारांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला आहे. मराठी कलाकार सोशल मीडियावर पोस्ट करून प्राजक्ताला  पाठबळ देत आहेत. 

विशाखा सुभेदार, हेमांगी कवी, गौतमी पाटील, कुशल बद्रिके, सचिन गोसावी यांच्यासह नितीन वैद्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. 

ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो. कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज  सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळी बाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे..आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.
- सचिन गोस्वामी

कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३/४ वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुध्दा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस“ होतय काळजात, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला intrest यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध!!

प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे.
- कुशल बद्रिके

प्राजक्ता माळी... मी तुझ्यासोबत आहे..!
आपल्या जीवावर भाषण करावी.. दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं, हे अजिबातच माणुसकीला धरून  नाही.
- विशाखा सुभेदार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com