'गरज सरो, वैद्य मरो!' प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंवर का भडकले?

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
P
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी नव्या आघाडी आणि समीकरणं जुळवण्यासाठी आता चर्चा सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवण्याचे प्रयत्न झाले होते. आता विधानसभा निवडणुकीतही त्यांची आघाडी होणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.  या चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले आंबेडकर?

प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया नेटवर्क X वर ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय. तुमचे पक्ष वाचविण्यात दलित, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता. दलित आणि बौद्धांने आता शहाणे व्हा, अशी टीका आंबेडकर यांनी केली आहे.

( नक्की वाचा : 'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये', मनसेचा टोला )

आंबेडकरांचे ट्विट काय?

'गरज सरो वैद्य मरो'चे उत्तम उदाहरण उच्च वर्णीय हिंदू नी भाजपा ला मतदान केले आणि उबाठा शिव सेना किंवा महा विकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलीत, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआ ला मतदान केले. पण तुमचे पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटत नाही. ही खरी त्यांची मानसिकता!  दलीत आणि बौद्धांने आता शहाणे व्हा.  तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही!  #घरात_आहे_पीठ

आंबेडकर का नाराज?

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ट्विटवर प्रकाश आंबेडकर यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. 'लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केलं. ज्यात मराठी होते, हिंदू होते, मुस्लिम होते आणि ख्रिश्चन देखील होते.' असं ट्विट उद्धव ठाकरेंनी केलं होतं. ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दलित आणि बौद्ध धर्मीयांचा वेगळा उल्लेख न केल्यानं आंबेडकर नाराज झाले आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article