नरेंद्र मोदींची उपस्थिती ...चिरंजीवीशी भेट... तमिलसाईंचा नमस्कार अन् दक्षिणेतील ते एक व्यासपीठ!

तामिळनाडूतील हा सोहळा जरी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा असला तरी सुद्धा काही प्रसंग असे घडले जे चर्चेत आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. ह्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह, गडकरी, नड्डा असे राष्ट्रीय नेते हजर होते. एवढच नाही तर साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणारे अनेक अभिनेतेही हजर राहिले. सोहळा जरी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा असला तरी सुद्धा काही प्रसंग असे घडले जे चर्चेत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेही आहेत. पण हे दोन्ही प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकणारे आहेत.

पहिला प्रसंग आहे तो नरेंद्र मोदी आणि मेगा स्टार पवन कल्याण यांच्यातला. शपथविधी सोहळा संपवून मोदी नायडूंचा निरोप घेत होते. तिथंच पवन कल्याणही उभे होते. ते नायडू आणि मोदींची चर्चा संपण्याची वाट बघत होते. जशीही त्यांची चर्चा संपली तसं पवन कल्याणनं मोदींच्या कानात काही तरी सांगितलं. मोदींनीही मग चौकशी केली. पवन कल्याणनं हाताचा इशारा करत बाजुलाच मेगा स्टार चिरंजीवी बसल्याचं सांगितलं. मग मोदींनी मोर्चा तिकडं वळवला आणि चिरंजीवीची भेट घेतली. दोन्ही भावंडांचा हात हातात घेऊन तेलुगु जनतेला अभिवादन केलं. 

दुसरा प्रसंग आहे तो तामिळनाडूच्या माजी राज्यपाल तमिलसाई यांचा. त्या व्यासपीठावर आल्या. नेत्यांना अभिवादन करत होत्या. त्यांची नजर अमित शाह आणि व्यंकय्या नायडू या दोन नेत्यांवर पडली. दोन्ही नेते कुठल्या तरी विषयावर गहन चर्चा करत होते. तमिलसाईंनी नमस्कार केला. दोन्ही नेत्यांनीही त्याला तसाच प्रतिसाद दिला. तमिलसाई नंतर पुढं निघाल्या तर अमित शाहांना काही आठवलं. त्यांनी पुढं जाणाऱ्या तमिलसाईंना थांबवलं आणि झापलं. अमित शाहांच्या चेहऱ्यावरचे भाव बरंच काही सांगणारं होते. तमिलसाई काही तरी स्पष्टीकरण देत होत्या आणि शाहा त्यांचं म्हणनं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. बाजुला बसलेले व्यंकय्या नायडूही शहांच्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देत मानेनं होकार देत राहिले. 

Advertisement

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमित शाह तमिलसाईंना नेमके काय म्हणत असावेत. तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू भाजपात सध्या रंगलेलं द्वंद्व. पार्टीत काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना प्रवेश देण्यात आला त्यामुळे भाजपचा तामिळनाडूत पराभव झाला असं वक्तव्य तमिलसाईंनी केलंय जे अन्नामलाईच्या सपोटर्सना चांगलंच झोंबलंय. त्यानंतर दोन्ही बाजूंनी सार्वजनिकरीत्या चिखलफेक सुरु झाली. ती चिखलफेक थांबवावी असं तर  अमित शाह तमिलसाईंना सांगत नसावेत?