जाहिरात

Pune News: अजित पवारांचा एकेरी उल्लेख, विनयभंगाचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला प्रकरण भोवणार

त्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व या सुनेत्रा पवार करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा केली जात आहे.

Pune News: अजित पवारांचा एकेरी उल्लेख, विनयभंगाचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याला प्रकरण भोवणार
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष नेतृत्व काही कठोर निर्णय घेणार आहे.
  • बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा महिलेच्या तक्रारीवरून दाखल झाला आहे
  • किशोर मासाळ याच्या आवाजातील ऑडिओ क्लिपमध्ये अजित पवार यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

देवा राखुंडे 

राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व सध्या अॅक्शनमोडवर दिसत आहे. विधान परिषद निवडणुकीत दोन जागा बिनविरोध निवडून आल्यानंतर पक्ष नेतृत्वाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यात गेल्या काही दिवसात पक्षातील काही नेत्यांच्या चुका समोर आल्या आहेत. त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. बारामती मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगरसेवक किशोर मासाळ हे आता पक्षनेतृत्वाच्या रडारवर आहे. त्याला कारणे ही तसेच आहे. शिवाय त्यांच्यावर फार गंभीर आरोप आहेत. एका आरोप थेट अजित पवारांशी संबंधीत आहे. त्यामुळे मासाळ यांच्यावर कडक कारवाईचे संकेत मिळत आहे. 

एका महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात याच नगरसेवक असलेल्या किशोर मासाळ याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. याशिवाय किशोर मासाळ याच्या आवाजाची एक ऑडिओ क्लिप सध्या वायरल होत आहे. त्यात त्याने "अजित पवार गेल्याने काय फरक पडला नाही" असं वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यात अजित पवारांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात बारामतीत संतापाची लाट उसळली आहे. शिवाय त्याच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे. 

नक्की वाचा - Trending News: पेट्रोल, डिझेल, गॅस संकटानंतर देशावर आता नवं संकट! यातून मार्ग कसा काढणार?

या संपूर्ण घटनेनंतर फेसबुकच्या माध्यमावर मासाळ याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात किशोर मासाळ याने या प्रकरणाबद्दल माफी मागितली आहे. शिवाय दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र असं असलं तरी पक्ष नेतृत्वाने किशोर मासाळ याचा राजीनामा मागितलेची सूत्रांची माहिती आहे. अजित पवारांचा एकेरी उल्लेख हा प्रकार आहेच पण  एका महिलेच्या तक्रारीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे त्याकडे पक्षाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यात राष्ट्रवादीचे नेतृत्व या सुनेत्रा पवार करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा केली जात आहे. 

नक्की वाचा - Shocking news: 'दुबईत नोकरी हवी असेल तर धर्म बदल' युट्यूबवर लग्न अन् त्यानंतर सुरू झाला खतरनाक खेळ, शेवटी...

याशिवाय पुण्यातील एका महिला पदाधिकाऱ्यासोबत चर्चा करतानाचा किशोर मासाळ याचा एक ऑडिओ सुद्धा सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. ज्यामध्ये "अजित पवार गेल्याने काय फरक पडला नाही, तू गेल्याने काय फरक पडणार आहे" असं संभाषण होतं. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमुळे बारामतीत संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर किशोर मासाळ याला फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. माफी मागितलेले आहे. असं असलं तरी पक्ष नेतृत्वानं किशोर मासाळ यांचा राजीनामा मागितला आहे. यानंतर आता किशोर मासाळ काय करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com