- भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे
- त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसमोर काही वादग्रस्त वक्तव्य केली
- मेधा कुलकर्णी यांनी खरेदी कोणाकडून कराल याबाबत अजब सल्ला ही दिला आहे
अविनाश पवार
भाजप खासदार मेधा कुलकर्णी या नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी पुन्हा असचं एक वादग्रस्त वक्तव्य शिवनेरी किल्ल्यावरील कार्यक्रमात केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्त आहे. त्या उपस्थितांना संबोधीत करताना म्हणाल्या की नुसत्या कसरती कवायती काय करता? त्या रक्तात भिनायला पाहीजेत. जेव्हा केव्हा वेळ येईल त्या वेळी कापून काढीन हे प्रत्येकाने मनाशी निश्चित केलं पाहीजे. समोरच्यांना वाटलं पाहीजे, तुम्ही आम्हाला घाबरून राहा हा इशारा त्यांना मिळाला पाहीजे अशा पद्धतीचे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे. विशेष म्हणजे इथं शालेय विद्यार्थी ही उपस्थित होते. याचं ही भान त्यांना हे वक्तव्य करताना राहीलं नाही. त्यांच्या यावक्तव्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
नारळ फुलवाले,गरब्यात डान्स करणारे,खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्यांची रूप रेखा पाहून कोणाकडुन खरेदी करायचे हे ठरवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. हिंदु राष्ट्र बनवण्याची ही शेवटची आणि उत्तम संधी आहे. पण, हे एकटे मोदी नाही बनवणार हे सांगायला ही त्या यावेळी विसरल्या नाहीत. मढीच्या जत्रेतला मुस्लिम समाजाकडून हिंदूनी खरेदी करू नये हा मुद्दा तापला असताना आज त्याचीच री कुलकर्णी यांनी ओढली. जागा विकताना कोणाला विकता,नारळ फुलवाले,गरब्यात डान्स करणारे,खोटा खोटा टिळा लावणारे या सगळ्यांची पाठीमागची रूप रेखा पाहून कोणाकडुन खरेदी करायचे हे ठरवा असं ही त्या म्हणाल्या.
असं केलं तरच आपण वाचणार आहोत. हिंदु राष्ट्र बनवण्याची शेवटची आणि उत्तम संधी आहे. पण हे एकटे मोदी नाही बनवणार.असं म्हणत छत्रपती शिवरायांना मावळ्यांनी जशी साथ दिली तशी साथ द्यायला हवी असं ही मेधा कुलकर्णी यांनी शिवनेरीवर म्हणाल्या. तिथीनुसारच्या शिवजयंती साजरी केली जाते त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कत्तलखाने महाराष्ट्रात कुठेही चालणार नाही, हा विडा उचला तरच आपल्याला शिवंदना सादर करण्याची अनुमती आहे असं ही त्या यावेळी म्हणाल्या. आपल्याला हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे.
नक्की वाचा - Maha Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केली? पैसे वाढले का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. एक काळ होता हिंदूंचं काय होईल असा प्रश्न होता. पण मोदी आले, आता आपण निर्भिड पणे सांगू शकतो आम्ही हिंदू आहोत. हिंदू म्हणून मरायचं असेल तर हिंदूंना फसवणारे अत्याचार करणारे त्यांचा काटा काढायचा आहे. हिंदूंचे कातील, हिंदूंचे मारेकरी एकही शिल्लक राहाणार नाही अशी शपथ घ्या असं ही त्या म्हणाल्या. 25 करोड अल्पसंख्याक कसे काय? नमाज पडतात ती जागा आमचीच म्हणतात. त्यामुळे आपण कसरती म्हणून कवायती करत नाही. ते आपल्या रक्तात भिनलं पाहीजे. जेव्हा केव्हा वेळ येईल त्या वेळी कापून काढीन असं प्रत्येकाला वाटलं पाहीजे. कौशल्य म्हणून शस्त्र हाती नको, तर तयारी म्हणून असलं पाहीजे. आम्हाला तुम्ही घाबरून राहा हा इशारा दिला पाहीजे. संघटीत शक्ती दिसली पाहीजे असं ही त्या यावेळी म्हटल्या.