7 days ago
मुंबई:

Raj Thackeray MNS Melava Speech Live :  दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे या मेळाव्यात धडाकेबाज भाषण करणार असून मनसेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येत मनसैनिक उपस्थित राहणार आहेत. तर राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतानाच विरोधकांचा समाचार घेणार आहेत. मुंबई महापालिकेत मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या जंगी सभेत भाषण करणार आहेत. मेळाव्यासाठी मैदानात मोठ्या स्क्रीनही लावण्यात आल्या आहेत. यावेळी राज ठाकरे कोणाचा व्हिडीओ सादर करणार आणि कोणत्या नेत्यांवर टीकास्त्र सोडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Mar 19, 2026 21:49 (IST)

Raj Thackeray Speech Live : तुम्ही सगळे जण महाराष्ट्राचा विचार करा- राज ठाकरे

सरकारकडे आपण फक्त आशेनं बघत राहायचं हे मला आवडणारी गोष्ट नाही. मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये.म्हणून तुम्ही सगळे जण महाराष्ट्राचा विचार करा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील, त्या आत्ता वेबसाईटवर मांडा.या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत, त्यांनाही वरती आनंद मिळेल की, माझी सर्व महाराष्ट्राची लोकं महाराष्ट्र वाचवतायेत. महाराष्ट्र जगवतायेत, असंही राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं. 

Mar 19, 2026 21:45 (IST)

Raj Thackeray Speech Live : "आपला गॅस बाहेरून येतो आणि..",राज ठाकरे काय म्हणाले?

आज महाराष्ट्रात सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे.कोणाला काहीही कळत नाही. जो येतो, तो नवं काहीतरी सांगतो. त्याच्यानुसार कंत्राटदाराला कामं दिली जातात. आपलं ऑईल बाहेरून येतं. आपला गॅस बाहेरून येतो.आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात. मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं.ते टुणटुणं आहे चांगलं..पण वापरात येऊ शकत नाही. ते म्हणजे स्वदेशीचं.  काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा.. हा देश ज्याच्यावर चालतो, ते ऑईल पण तुमचं बाहेरून येतोय, असंही राज ठाकरे म्हणाले.

Advertisement
Mar 19, 2026 21:33 (IST)

Raj Thackeray Speech Live : आपल्या महापुरुषांकडे कोणाकडेही जातीने पाहू नका- राज ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हा शब्द त्यांनी दिला.छत्रपती संभाजी महाराज..छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टीकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी आणि शत्रुशी समर्थपणे आणि प्राणपणाने लढणारे धर्मवीर..बाळाजी विश्वनाथ पेशवे, योद्धा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान होते. मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करणार आहे, ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राला मोठा केला, कृपया आपल्या महापुरुषांकडे कोणाकडेही जातीने पाहू नका. त्यांनी या महाराष्ट्रासाठी काय केलं आणि काय योगदान दिलं ना, ते सर्वात महत्त्वाचं आहे,असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

Mar 19, 2026 21:25 (IST)

Raj Thackeray Speech Live : संत परंपरेबाबत राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान, म्हणाले..

पहिली संत परंपरा..संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास स्वामी, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, आमच्या जिजाई महाराज..या देशातील पहिली बंडोखोर स्त्री ज्या आईने स्वत:च्या वडिलांना विचारलं होतं की, दुसऱ्याकडे कशाला चाकरी करता? स्वत:च्या नवऱ्याला विचारलं स्वत:चं राज्य निर्माण करा.दुसऱ्याकडे कशाला जाता? आणि मग एक सूर्य जन्माला दिला. स्वराज्य काय असतं ते त्या मातेनं त्या पुत्राकडून घडवून घेतलं. ती बंडखोर स्त्री या महाराष्ट्रात जन्माला आली, असं मोठं विधान राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात केलं.

Mar 19, 2026 21:17 (IST)

Raj Thackeray Speech Live : महाराष्ट्राची ताकद आपण विसरलो - राज ठाकरे

आम्ही इन्स्टाग्राममध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाहीय.आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलो आहोत. मी बोलेने, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोणत्या भूमित जन्माला आला आहात? तु्म्ही कोणाचे वारस आहात? मी नेहमीच सांगतो, हा महाराष्ट्र देशाला दिशा दाखवत आला. महाराष्ट्राची नेमकी क्षमता काय आहे? तुम्ही कधी जवळून पाहिलंय का? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात सांगतो. महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही बघून घ्या. आपल्या महाराष्ट्राची ताकद आपण विसरलो आहोत, असंही राज ठाकरे म्हणाले.

Mar 19, 2026 21:12 (IST)

Raj Thackeray Speech Live : महाराष्ट्रात दररोज किती मुले बेपत्ता होतात? राज ठाकरेंनी आकडेवारी सांगितली

विधानसभेत आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला..एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दरवर्षी साधारण साडेचार हजार ते साडेपाच हजार मुले बेपत्ता होतात. त्यांच्या आई-वडिलांना काय होत असेल? असा होता महाराष्ट्र? असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Advertisement
Mar 19, 2026 21:04 (IST)

Raj Thackeray Speech Live : मुंबईतून लहान मुलं-मुली पळवली जातात- राज ठाकरे

"ग्रामीण भागात प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली मुलं मुली शहरात येतात. शहरं बकाल पडलेली आहेत. शहरांमध्ये ड्रग्ज मिळत आहेत.लहान मुली-मुलं पळवली जात आहेत. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईत 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या", अशी खळबळजनक माहिती राज ठाकरेंनी उघड केली.

Mar 19, 2026 21:00 (IST)

Raj Thackeray Speech Live : शाळांमध्ये ड्रग्ज विकले जातात- राज ठाकरे

आमच्याकडचे आमदार, खासदार, कंत्राटदार, पैसे..एवढचं सुरु आहे फक्त.महाराष्ट्र विकायला काढला आहे.आज मुख्यमंत्र्‍यांकडे ग्रुह खातं आहे.संपूर्ण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत.शाळांमध्ये ड्रग्ज विकले जात आहेत. कॉलेजमध्ये ड्रग्ज जातायत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत.ड्रग्जच्या आहारी जाऊन आपण महाराष्ट्राचं काय करणार आहोत? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

Advertisement
Mar 19, 2026 20:55 (IST)

Raj Thackeray Speech Live : आपलेच लोक हिंदीत बोलत असतात-राज ठाकरे

महाराष्ट्र म्हणून आपण स्वत:चं अस्तित्व गमावून बसतोय.तुम्ही मराठी भाषा बोलणारे आहात, म्हणून तुम्ही मराठी आहात. मी काही व्हिडीओ बघतो. अनेक लोकांमध्ये भांडणं चालू असतात. आपलेच लोक हिंदीत बोलत असतात. हिंदी मत बोलना, असं आपले लोक बोलतात. मग तू काय करतोय..जा दक्षिणेकडे बघा. तामिळनाडू बघा.आंध्रप्रदेश बघा. केरला बघा. गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टीकवून आहे. प्रत्येक राज्य आपली भाषणा टीकवून आहे"असंही राज ठाकरे म्हणाले. 

Mar 19, 2026 20:48 (IST)

Raj Thackeray Speech Live : कोस्टल रोडबाबत राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

"आजपर्यंत तीन वेळा कर्जमाफी झाली. या देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे.दररोज आत्महत्या होत आहेत. रोज होतात.रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत. कोणाला काही पडलेलं नाही. हे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधत आहेत. आम्हीच स्तुती करतो. अरे तो रस्ता तुमची वाट लावायला झाला आहे.तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाही. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे तो..",असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. 

Mar 19, 2026 20:43 (IST)

Raj Thackeray Speech Live : आम्ही मोबाईलमध्ये अडकलोय, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray Speech Live : "आम्ही मोबाईलमध्ये अडकलो आहे. आज महाराष्ट्राची परिस्थिती काय झाले? महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना हे कर्ज 2 लाख कोटी होतं. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर बघा. त्याला ना आकार ना ऊकार आहे..कोणीही कुठेही इमारती बांधतोय. कोणालाही कसल्याही परवानग्या दिल्या जातात. तुम्ही ते पाहत आणि राग मोबाईल व्यक्त करता..", असं मोठं विधान राज ठाकरेंनी यावेळी केलं.

Mar 19, 2026 19:49 (IST)

MNS Melava 2026 Live : मेळाव्यापूर्वी मनसेनं शेअर केला महत्त्वाचा व्हिडीओ

मनसेचा गुडी पाडवा मेळावा थोड्याच वेळात शिवाजी पार्कात सुरु होणार आहे. राज ठाकरे या मेळाव्याच्या माध्यमातून मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे विरोधकांना धारेवर धरणार आहेत. आगामी काळात मनसेचा अजेंडा काय असणार आहे, याबाबत राज ठाकरे काय भाष्य करतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mar 19, 2026 19:40 (IST)

MNS Melava 2026 Live : थोड्याच वेळात मनसे मेळाव्याचा थरार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुडी पाडवा मेळावा थोड्याच वेळात सुरु होणार आहे. या मेळाव्यात मनसे पदाधिकाऱ्यांसह राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. तत्पूर्वी मनसेच्या एक्स पेजवर महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना मनसेकडून गुडी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.