Raj Thackeray Gudi Padwa Rally : लोकसभा निवडणुकीत मनसे काय करणार ? या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) गुढीपाडवा मेळावा मंगळवारी (9 एप्रिल) रोजी झाला. त्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भाषणाची अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे त्याचे स्वाभाविकच जोरदार पडसाद उमटले आहेत. सोशल मीडियावर राज यांच्या भाषणाचे जोरदार मीम्स व्हायरल होत आहेत.
राज ठाकरे यांनी 2014 साली नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी पाठिंबा दिला होता. 2019 मध्ये त्यांनी मोदींच्या विरोधात प्रचार केला. 'लाव रे तो व्हिडीओ' ही त्यांच्या भाषणाची टॅगलाईन तेव्हा चांगलीच गाजली होती. आता पुन्हा एकदा राज मोदींच्या गोटात दाखल झाल्यानं नेटकऱ्यांच्या प्रतिभेला उधाण आलं आहे. 'ते सतत भूमिका बदलणारे इथंच राहतात का?' हा प्रश्न @imDAmit या युझरनं ट्विटरवर मीम्स शेअर करत विचारला आहे.
राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देताच तेजल कृष्णकुमार राऊत यांनी फेसबुकवर एका जुन्या जाहिरातीचा संदर्भ देऊन कोपरखळी लगावलीय.
NH Studio यांनी 'अशी ही बनवाबनवी' या सिनेमातील प्रसंगाच्या आधारे राज ठाकरेंच्या भूमिकेला विनोदातून टोला लगावला आहे.
काय झालं रे मेळाव्यात... हे विचारणारी @nikhill_bhosale यांची पोस्ट देखील चांगलीच व्हायरल झाली आहे.
X, फेसबुक, व्हॉट्सअप या सर्वच माध्यमातून राज ठाकरे यांच्या भाषणावरच्या विनोदी पोस्ट सध्या व्हायरल झाल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर तापला असताना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे मीम्स पाहून नेटकऱ्यांचं मनोरंजन होत आहे.