एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश कधी होणार? सुनबाई रक्षा खडसे थेट बोलल्या

दिल्लीतील नेत्यांनी आपल्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचे स्वत: खडसे यांनी सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत खडसे यांनी सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
जळगाव:

एकनाथ खडसे गेल्या कित्येक दिवसापासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यासाठी त्यांच्या दिल्लीवाऱ्याही झाल्या. पण पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही निघाला नाही. लोकसभा निवडणूक झाली. विधानसभेची निवडणूक होवू घातली आहे. तरही खडसे हे वेटींगवर आहेत. दिल्लीतील नेत्यांनी आपल्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचे स्वत: खडसे यांनी सांगितले होते. लोकसभा निवडणुकीत खडसे यांनी सुनबाई रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता. त्यात त्यांचा विजयही झाला. पण खडसेंचा पक्ष प्रवेश काही झाला नाही. राज्यातील नेत्यांनी तर खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबत बोलणे टाळले आहे. आता केंद्रीय मंत्री आणि एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशा बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकी पूर्वी सांगितले होते. त्यासाठी त्यांनी दिल्ली भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. विनोद तावडे यांनी ही भेट घडवून आणली होती. त्यानंतर खडसे भाजपमध्ये येणार हे निश्चित झाले होते. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्यांच्या प्रवेशाबाबत माहित नसल्याचे सांगितले होते. तेव्हा पासून खडसेंचा पक्ष प्रवेश रखडला आहे. लोकसभा निवडणुकीत आपल्याला पक्षाचे काम करायला सांगितले असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांच्या पक्ष प्रवेश होईल असे बोलले जात होते पण तसेही झाले नाही. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात तरी खडसेंचा पक्ष प्रवेश होणार का? हा प्रश्न आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

यावर आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. पक्ष प्रवेशाबद्दल एकनाथ खडसे हे स्वत: आपले मत मांडू शकतात. त्यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल निर्णय हा पक्षात वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्यावर आपण बोलणं योग्य ठरणार नाही. तेवढे आपण मोठे झालेलो नाही असेही रक्षा खडसे म्हणाल्या. मात्र पक्ष प्रवेशाबाबतचा विषय हा पक्षश्रेष्ठींपर्यंत गेला आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल असं ही त्या म्हणाल्या.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  जागा एक इच्छुक अनेक! पुरंदर विधानसभेची लढत गाजणार?

लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी आपल्या विजयासाठी मेहनत घेतली होती. त्या विजयात त्यांचा वाटा मोठा आहे. निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी मदत करावी असे केंद्रीय नेत्यांना त्यांना सांगितलं होतं असंही रक्षा खडसे म्हणाल्या. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी आपली इच्छा असल्याचे रक्षा खडसे म्हणाल्या. रक्षा खडसे यांच्या वक्तव्याने एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेशा बाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Advertisement