'हे पार्सल दिल्लीला पाठवतील' धैर्यशिल मोहिते पाटलांच्या विधानावर राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

अकलूजमधील सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरज मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
अकलूज:

अकलूजमधील सभेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरज मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांच्यावर केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आज राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. 

धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले?
14 एप्रिलला अकलूज येथे झालेल्या सभेत धैर्यशिल मोहिते पाटील यांनी एका माणसाला उत्तर द्यायचं असल्याचं सांगून राम सातपुतेंचं नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, मला एका माणसाला उत्तर द्यायचं आहे. त्यांना आपण इथून निवडून दिलं आहे. मांडव्यातील एका सभेत ते म्हणाले की, गेल्या 70-75 वर्षात जेवढा विकास झाला नाही, तेवढा मी गेल्या अडीच वर्षात केला. यावर मी उत्तर देतो. दादांच्या सांगण्यावरुन लोकांना एका रात्रीत तुला आमदार केलं. आता तुझं पार्सल एका रात्रीत माघारी बीडला पाठवायचंय, असं धैर्यशिल मोहिते पाटील यावेळी म्हणाले होते. 

राम सातपुते यांची प्रतिक्रिया  
राम सातपुते सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार आहे. त्यांनी धैर्यशिल मोहिते पाटलांचं विधान गरीब कुटुंबातील मुलाला हिणवण्यासारखं आहे. ते पुढे म्हणाले, मी ऊसतोड कामगारांचा गरीब कुटुंबातली मुलगा आहे. पहाटेपासून ऊस तोडून ते कष्ट करतात. अशा प्रकारचं विधान करणं म्हणजे,         कष्टकरी गरीब कुटुंबातील मुलाला हिणवलं जात आहे. मात्र 4 तारखेला सोलापूरमधील जनता येथील मागण्यांच पार्सल घेऊन दिल्लीला पाठवतील. 

हे ही वाचा- सांगलीत भाजपला मोठा धक्का, विलासराव जगतापांचा राजीनामा; विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर

माढ्यात धैर्यशिल मोहिते पाटील विरूद्ध रणजितसिंह निंबाळकर लढत...
शरद पवारांनी धैर्यशिल मोहिते पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर केल्याने माढ्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी ही लढत अटीतटीची ठरणार आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी धैर्यशिल यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे सोलापूर, बारामती आणि आजूबाजूच्या भागात मोहिते पाटील घराण्याचं वर्चस्व पाहायला मिळतं. अशावेळी निंबाळकरांना नवी रणनीती आखण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. 
 

Advertisement