Kadam vs Parab: 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,' रामदास कदम यांचा अनिल परब यांच्यावर हल्लाबोल

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विधानपरिषदेत गंभीर आरोप करणारे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर उद्या (बुधवार, 23 जुलै) हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

राकेश गुडेकर, प्रतिनिधी

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर विधानपरिषदेत गंभीर आरोप करणारे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर उद्या (बुधवार, 23 जुलै) हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे. योगेश कदम यांचे वडील रामदास कदम यांनी हा इशारा दिला आहे.

काय म्हणाले कदम?

'हा टीनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय. उद्धव ठाकरेंनी कदम कुटुंबियांना संपवायचा विडा उचलला आहे. अनिल परबच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरे मातोश्रीत बसून चाप ओढत आहे, असा आरोप रामदास कदम यांनी केला. 

अनिल परब अर्धवट वकील आहे. सभापतींद्वारे कुठलीही 35 ची नोटीस न देता आरोप केले. सभापतींद्वारे कुठलीही 35 ची नोटीस न देता आरोप केले. सभागृहात खोटी माहिती द्यायची, वरून  दादागिरीची भाषा करायची...बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,' असं आव्हान कदम यांनी दिलं. 

( नक्की वाचा : Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी का दिला राजीनामा? 10 तासांमध्ये काय घडलं? वाचा Inside Story )
 

डान्स बार चालवून लोकांना उद्धवस्त करण्याचं पाप आम्ही केलं नाही. हे हॉटेल 35 वर्ष सुरु आहे. त्याचा योगेश कदम यांच्याशी काय संबंध आहे? असा प्रश्नही रामदास कदम यांनी विचारला. दादागिरीला आम्ही भीक घालत नाही, आम्हाला नियम माहिती आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. 


काय म्हणाले होते अनिल परब?

'गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार आहे,' असा खळबळजनक आरोप कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना केला होता. राज्यात डान्सबारला बंदी आहे. त्यानंतरही हा बार सुरु असून त्याचं परमिट गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर असल्याचा आरोप परब यांनी केला.

या डान्सबारवर 30 मे 2025 रोजी समतानगर पोलीस स्टेशननं रेड केली. त्यावेळी 22 बारबाला पकडल्या गेल्या. त्याची यादी देखील मी देतो, असं आव्हान परब यांनी दिलं. या प्रकरणात बारच्या 4 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलं. पोलिसांनी या सर्व प्रकरणाचा पंचनामा केला. त्यामध्ये त्या बारचं परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावावर असून त्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्री आहेत, असा आरोप परब यांनी केला होता.

Advertisement
Topics mentioned in this article