April Fool: 'मतदारांच्या डोळ्यात फेकली धूळ, भाऊ,भाई ,दादा म्हणतात एप्रिल फूल' हे ट्वीट चर्चेत का?

मतदारांच्या डोळ्यात फेकली धूळ, भाऊ, भाई , दादा म्हणतात एप्रिल फूल... अशी पद्धतीचे पोस्ट करत त्यांनी महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

आज एक एप्रिल, म्हणजेच फुल्स डे ! दरवर्षी या दिवशी लोक एकमेकांना फसवून एप्रिल फूल (April Fool) बनवतात. या दिवशी एकमेकांची चेष्टा-मस्करी करत विनोद केले जातात. अनेक जण हा दिवस साजरा करताना खोड काढतात आणि फसवण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी एक व्हिडिओ करत सरकार डिवचले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ टाकला आहे. ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारात कर्जमाफी माफी करू असे आश्वासन देत आहेत. फडणवीस निवडणुकी आधी सांगत आहेत की, सरकार आल्यास शेतकऱ्याला पूर्ण कर्जमाफी दिली जाईल. शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा... अशी घोषणा दिली होती. ती घोषणा देतानाचा व्हिडीओ रोहिणी खडसे यांनी शेअर केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Kalamb Crime: अनैतिक संबंध अन् ब्लॅकमेलिंग.. कळंबमधील 'त्या' महिलेची मर्डर मिस्ट्री उलगडली, ड्रायव्हरनेच...

बरं खरी गंम्मत पुढे आहे. फडणवीसांचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर त्यांनी थोडं थांबा असं सांगत एक गॅप घेतला आहे. त्यानंतर त्यांनी अजित पवारांचा व्हिडीओ लावला आहे. बरं हा व्हिडीओ निवडणुकी आधीचा नाही तर निवडणूकीनंतर सत्ते आल्यावरच आहे हे विशेष. या व्हिडीओत अजित पवार कर्जमाफी शक्य नाही असं सांगताना दिसत आहेत. ते म्हणत आहेत आजची तारीख किती आहे ते पाहा आणि तुमचे हाफ्ते वेळीच बँकेत भरा. यावरून मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री जनतेची कशी फसवणूक करत आहेत हे रोहिणी खडसे यांनी दाखवले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Nashik To Ayodhya Flight: प्रभू श्रीरामांचे दर्शन अवघ्या काही तासात! नाशिक ते अयोध्या विमानसेवा सुरु; वाचा सविस्तर..

Advertisement

रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्यात की  शेतकरी कर्जमाफी...,महिलांना 2100 रु...,महाराष्ट्रात सुख व‌ शांती...
15 लाख रुपये..., अच्छे दिन... असं सांगत त्या लिहीतात,  मतदारांच्या डोळ्यात फेकली धूळ, भाऊ, भाई , दादा म्हणतात एप्रिल फूल... अशी पद्धतीचे पोस्ट करत त्यांनी महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. शिवाय ती एक चर्चेचा विषय ही ठरली आहे. निवडणुकी आधी आणि निवडणुकीनंतरचे महायुतीचे नेते काय म्हणतात हेच त्यांनी पुराव्यासह मांडून महायुतीची खिल्ली उडवली आहे.