Rohit Pawar : रोहित पवारांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीला दांडी, वेगळ्याच चर्चा सुरू

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार माध्यमांपासूनही दूर असल्यामुळे विविध चर्चा रंगल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min

Sharad Pawar group meeting : शरद पवार गटाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीच आयोजन करण्यात आलं आहे. आज मुंबईत ही बैठक बोलावण्यात आली होती. दरम्यान या बैठकीला रोहित पवार अनुपस्थितीत राहिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. आधीच जयंत पाटील यांनी  रात्री उशीरा चंद्रशेखर बानवकुळेंची भेट घेतल्याच्या चर्चा असताना आता रोहित पवारच्या अनुपस्थितीने प्रकरणाला वेगळच वळण लागलं आहे. गेल्या काही दिवसांपासूनही रोहित पवार माध्यमांपासून दूर असल्याचं दिसत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरम्यान रोहित पवार बाहेरगावी असल्यामुळे बैठकीला अनुपस्थित असल्याची माहिती रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तब्येतीच्या कारणास्तव रोहित पवार माध्यमांपासूनही दूर आहेत.

नक्की वाचा - Political News : विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून ही 3 नावे चर्चेत; आजच्या बैठकीत नाव निश्चित होण्याची शक्यता

सध्या मात्र त्यांची तब्येत चांगली असल्याची तसेच अर्थ संकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहणार असल्याची पवारांच्या कार्यालयाची माहिती आहे.