Santosh Deshmukh : पंकू ताई ते धनू भाऊ, सुरेश धसांनी वर्मावर बोट ठेवलं, आक्रोश मोर्चात हल्लाबोल

या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुण कहाणी बोलत आहे. करुणा काहाणी फार वेगळी आहे. त्या बद्दल आता काही बोलणार नाही असं धस यावेळी म्हणाले.

जाहिरात
Read Time: 4 mins
बीड:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला यासाठी आक्रोश मोर्चाचे बीडमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व पक्षाचे नेते, समाजिक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय त्यांनी त्याबरोबर पंकजा मुंडे यांनाही लक्ष केलं. हे दोघे ही एकच आहेत. असा आरोप करत संतोष देशमुख यांच्या हत्ये मागच्या प्रमुख आरोपीला अजून अटक का नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खून करणे, जमिनी बळाकावणे, दादागिरी, गुंडगिरी, खंडणी या सारखे प्रकार बीडमध्ये कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहेत याचा पाढाच यावेळी धस यांनी वाचला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख यांना मारण्याची ही कोणती पद्धत. तुम्हाला माणसं मारण्याचा अधिकार कोणाला दिला. या देशात मुंगीलाही मारण्याचा कुणाला अधिकर नाही. संतोष देशमुख हे तीन टर्म सरपंच होता. ते भावी जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्याच्यात नेतृत्व करण्याची गुण होते. त्यालाच या लोकांनी संपवला. याच संतोष देशमुखने विरोध असतानाही मस्साजोगमध्ये पंकजा मुंडे यांचे स्वागत केले होते. विधानसभेत ही संतोष देशमुख हे बुथ प्रमुख होते. त्यांचा खून झालेलं कोणालाही पटलेलं नाही. तरीही काही जण आजही फेसबूक, वॉट्सअपवर ऐसा करेंगे वैसा करेंगे असं सुरू आहे. त्यांच्या एक कानाफाटात मारलं तर ते कुठच्या कुठे पडतील असं धस यावेळी म्हणाले. ही माणसं कोणाची आहेत असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Manoj Jarange Patil: जिल्ह्या- जिल्ह्यात मोर्चे, कुणाचा बाप आला तरी... संतोष देशमुख हत्येवरुन जरांगे पाटील कडाडले

हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवत होते. तेच टरबूजा म्हणून बोलत होते. तेच आता मुख्यमंत्र्याच्या जवळ जात आहेत. मला माझी औकात काय आहे हे हेच लोक विचारत आहेत. तर मी 80 हजारांनी निवडून आलो आहे. ही माझी औकात आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. धनू भाऊ तुम्ही 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आलात ना. पण तुम्हीची निवड ही बोगस होती. तुम्ही बोगस मतांवर निवडून आला आहात. शाई एकाच्या बोटाला मतदान दुसरा करत होता असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांची निवड ही बोगस आहे असंही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Satish Wagh Case: सतिश वाघ यांचेही अनैतिक संबंध, पत्नीला मारहाण अन् छळ.. हत्या प्रकरणात नवा ट्वीस्ट

बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. अनेकांकडे सध्या बंदुकीची लायसन्स आहेत. ही लायसन्स ज्यांनी दिली आहेत त्यांच्या सर्वांवर कारवाई झाली पाहीजे अशी मागणी या निमित्ताने धस यांनी केली. आम्ही पाच टर्म आमदार आहोत. पण आम्हालाही अजून सुरक्षा मागावी लागते असंही ते म्हणाले. संतोष देशमुख यांचा ज्या पद्धतीने खून झाला तो निर्घुण होता. त्यांच्या शरीरात दोन लिटर रक्त गोठले होते. त्याला प्रचंड मारहाण झाली होती. मी पंकू ताईंना विचारतो तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाहीत? तुमच्या सत्काराला विरोध असताना ही याच संतोष देशमुखांनी केला होता याची आठवण धस यांनी करून दिली. पण तुम्हाला हुजरेगिरी करणारे आवडतात. पण आम्ही तुमच्या पुढे हुजुरेगिरी करणार नाही. तुम्ही संतोष देशमुखच्या घरी यायला पाहिजे होते. तुम्ही आला नाहीत. ही तुमची मोठी चुक होती. तुम्ही का आला नाहीत याचं उत्तर द्या असं आव्हान ही यावेळी धस यांनी दिलं. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Manmohan Singh: धुरंधर नेत्याला अखेरचा निरोप! माजी पंतप्रधान मनमोहन सिंग अनंतात विलीन

यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. बीडमध्ये खंडणीचं रॅकेट कोण चालवत आहे असा सवाल त्यांनी केला. वाळुची तस्करी होत आहे. राखेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. त्या मागे कोण आहेत. पंकज मुंडे या पालकमंत्री असताना त्यांनी या गोष्टी का थांबवल्या नाहीत असा प्रश्नही धस यांनी यावेळी केला. याचं कारण हे दोघेही वेगळे दिसत असले तरी आतून एकच आहे. पंकजा ताईंकडून धनू भाऊनं सर्व काढून घेतलं हे त्यांना कधी समजलंच नाही. आता सर्व काही आका सांभाळत आहेत. त्यांना मंत्री, पालकमंत्री, डीपीडीसी, कृषी खातं  भाड्यानं दिलं होतं असा गंभीर आरोपही धस यांनी यावेळी केला. त्यावेळी कोणतीही फाईल क्लिअर करायची असल्यास वाल्मिक कराडला 9 लाख द्यावे लागत होते. ही वस्तुस्थिती असल्याचे धस म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Palghar Accident: अतिघाईने घात केला... भरधाव रेल्वेखाली चिरडून दोघांचा मृत्यू; पालघरमधील घटना

ही या बीड जिल्ह्याची करुण कहाणी आहे. मी करुण कहाणी बोलत आहे. करुणा काहाणी फार वेगळी आहे. त्या बद्दल आता काही बोलणार नाही असं धस यावेळी म्हणाले. त्यांचा रोख करुणा मुंडे यांच्या दिशेने होता. शिवाय ते धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी बद्दलही यावेळी जाहीर पणे म्हणाले. त्यांचे खुप हाल होत आहेत. पण याबाबत आपण अधिक बोलणार नाही असंही ते म्हणाले.या लोकांनी अनेकांचे संसार उद्धवस्त केले. जमिनी लाटल्या. खून पाडले. अशा लोकांना बीन भाड्याच्या खोलीत पाठवल्या शिवाय राहाणार नाही. आपण सर्वांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, सर्वांनी एक रहा असं आवाहन त्यांनी यावेळी केले.