Exclusive : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, भाजपाच्या बड्या नेत्यानं सांगितला प्लॅन

CM Eknath Shinde : महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झाला असतानाच भाजपाच्या बड्या नेत्यानं मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Advertisement
Read Time: 2 mins
Eknath Shinde
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत.  महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानं महाविकास आघाडी आक्रमक मूडमध्ये आहे. मविआनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावं, अशी मागणी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलीय. दुसरीकडं महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण झालाय. त्यातच भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षाचा प्लॅन सांगितला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोण होणार मुख्यमंत्री?

विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवेल. एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं नाही, असं दानवे यांनी  'NDTV मराठी' ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये स्पष्ट केलंय. त्याचबरोबर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत येणार का? या प्रश्नावर त्यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं असं सूचक उत्तर दिलंय. 

तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचे काही सूत्र असू शकतात. ज्यांनी जी जागा जिंकली आहे ती जागा त्या पक्षाला मिळेल. बाकीच्या जागेबद्दल विचार होऊ शकतो, असं दानवे यांनी सांगितलं. दानवे यांनी यावेळी शिवसेना नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही टीका केली. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडचा पाकिस्तान केला आहे, असा आरोप दानवे यांनी केला. दानवे यांनी यावेळी सत्तार यांच्या विरोधातील अनेक पुरावे NDTV च्या कॅमेऱ्यासमोर सादर केले.  

ट्रेंडींग बातमी - 'पंकजा मुंडेंना पहिल्यांदाच धोका दिला', शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची Audio Clip Viral
 

जालना लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मागील पाचवेळा ही जागा जिंकणाऱ्या दानवे यांना यंदा विजयी सिक्सर लगावता आला नाही. त्यानंतर या पराभवाला अब्दुल सत्तारच जबाबदार असल्याचा दावा भाजपानं केला आहे. त्याचबरोबर सत्तार यांनी देखील माझ्या कार्यकर्त्यांनीच पाडलं असं सत्तार यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं दानवे यांनी या  मुलाखतीमध्ये विश्लेषण केलंय. त्यामुळे आता आगमी विधानसभा निवडणुकीतही दानवे विरुद्ध सत्तार वाद पेटण्याची शक्यता आहे. 

Advertisement