Rohidas Patil : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचं निधन

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांचे निधन झालं आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
धुळे:

उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांचे निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त होते. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे. उद्या सकाळी 11 वाजता धुळे शहरातील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयाच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापुरात आपल्या मुलीकडे गेले असताना त्याची प्रकृती बिघडल्याचं वृत्त समोर आलं होतं. फुप्फुस कमी क्षमतेने काम करीत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते.