अजित पवारांना घरात जागा, पण पक्षात... शरद पवारांचं सूचक वक्तव्य

Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवारांना पक्षात परत घेणार का? या प्रश्नावर शरद पवारांनी उत्तर दिलंय.

Advertisement
Read Time: 2 mins
S
पुणे:

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी राज्यातील सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आणि शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे गट एकमेकांच्या विरोधात लढले. त्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. त्यांना फक्त 1 जागा मिळाली. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागांवर यश मिळालं. 

अजित पवारांप्रमाणेच सत्तारुढ महायुतीचाही लोकसभा निवडणुकीत राज्यात पराभव झाला. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाला यंदा फक्त 9 जागा मिळाल्या. भाजपाच्या या मोठ्या पराभवाला अजित पवारांसोबतची युती कारणीभूत आहे, असा ठपका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूखपत्रानं व्यक्त केला होता. पुणे जिल्ह्यातील भाजपा नेत्यानंही अजित पवारांसोबतच्या युतीवर नाराजी व्यक्त केली होती.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लोकसभा निवडणुकीनंतरची धुसफूस आणि आगामी विधानसभा निवडणुकीचं जागावाटप या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार महायुतीमध्ये नाराज आहेत, अशी चर्चा सुरु आहे. अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार असा अंदाजही काही जण व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली. तर सुनेत्रा पवार मंगळवारी पुण्यातील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या मोदी बागेत गेल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षात घेण्याबाबतचा निर्णय मी घेणार नाही. पक्षातल्या जागेबाबतचा निर्णय सहकारी घेतील,' असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलंय. 

Advertisement

( नक्की वाचा : जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण )

अजित पवारांना धक्का

अजित पवारांबाबतचा निर्णय पक्षातील सहकारी घेणार असं शरद पवारांनी जाहीर केलंय. पण, हे जाहीर करण्याच्या काही तास आधी त्यांनी अजित पवारांना धक्का दिलाय. पिंपरी-चिंचवडमधील जित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अन्य 18 पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात पक्षप्रवेश केला.  

Topics mentioned in this article