विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांची गुगली, मराठा आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा फटका सत्ताधारी भाजपला बसला होता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
सांगली:

मराठा आरक्षणाचा विषय अजूनही मार्गी लागलेला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी होत आहे. त्यासाठी मराठा समाज भलताच आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या रोषाचा फटका सत्ताधारी भाजपला बसला होता. आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. त्यात आता शरद पवारांनी आरक्षणाबाबत मोठं विधान केलं आहे. शिवाय आरक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला आरक्षण कसे मिळेल याचाही मार्ग त्यांनी या निमित्ताने सांगितला आहे. त्यासाठी त्यांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

शरद पवारांनी आरक्षणाची मर्यादा वाढवणे गरजेचे असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने त्यासाठी पावलं टाकणे आवश्यक आहे. केंद्र सरकार तसे करणार असेल आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. सध्या पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येत नाही. जर पन्नास टक्क्यावर आरक्षण हवं असेल तर संसदेत त्याबाबत कायदेशीर दुरुस्ती केली पाहीजे. तशी दुरूस्ती करायला काय हरकत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या 50% आरक्षण आहे. दुरुस्ती केल्यानंतर   75% पर्यंत जावू द्या अशी मागणीच त्यांनी केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा वारंवार पाठलाग, विनयभंग अन् पुढे...

याबाबत पुढे बोलताना त्यांनी सांगितले की  एक काळ होता, त्यावेळी तामिळनाडूमध्ये आरक्षण जवळपास 78 टक्क्यांपर्यंत होते. त्यामुळे जर तामिळनाडून 78 टक्के आरक्षण होऊ शकते तर महाराष्ट्रात आरक्षण 75 टक्के का होऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. जर ही मर्यादा वाढवी गेली तर आणखी 25 टक्के आरक्षण उपलब्ध असेल. त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळालेलं नाही त्यांचा त्यात विचार होईल असंही ते म्हणाले. त्यात कुठे वादही होणार नाही. त्यामुळे मर्यादा वाढवणे हा एकमेव पर्याय असल्याचेही पवार म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - मित्राबरोबर घाटात फिरायला गेली अन् घात झाला, पुण्यात 21 वर्षीय तरुणी बरोबर भयंकर घडलं

संसदेत याबाबतचा केंद्रातील भाजप सरकारने ठराव आणला तर आमचा पक्ष त्याला जाहीर पाठिंबा देईल असेही त्यांनी सांगितले. शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांबरोबर बोलत होते. दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. मात्र एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला जात असताना दुसरीकडे मराठी शाळांची संख्या घटत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यावर सरकारने लक्ष घातले पाहीजे. त्यातून काही तर मार्ग काढला पाहीजे अशी प्रतिक्रीया दिली. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वैध आहे का? उच्च न्यायालयाचा थेट सवाल

दरम्यान राष्ट्रावादी शरद पवार गटात अनेक जण प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतही पवारांना विचारण्यात आले. त्यावर ते थांबा आणि पाहा असे उत्तर त्यांनी दिले. अनेक जुने सहकारी पक्षात येण्यास इच्छुक आहेत. त्यांना आता समजले आहे की आपण ज्या मार्गावर गेलो होतो तो योग्य नव्हता. त्यामुळे ते आता योग्य दिशेला येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करतो असेही ते यावेळी म्हणाले. मविआचा मुख्यमंत्रिपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर घेतला जाईल असे ही त्यांनी स्पष्ट केले.