अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. त्यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. जवळपास 1000 कोटींची मालमत्ता आयकर विभागाने मुक्त केली आहे. या निर्णयामुळे मुंबईतील नरिमन पॉइंट, निर्मल टॉवर, पुण्यातील जमीन, कोल्हापूरमधील इतर मालमत्ता, तसेच काही वेगवेगळ्या भागांतील मालमत्ता अजित पवार आणि कुंटुबीयांना पुन्हा मिळणार आहेत. या निर्णयानंतर शरद पवारांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रीया दिला आहे. शिवाय याबाबत एक प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
2021 मध्ये बेनामी संपत्ती प्रकरणी प्राप्तिकर विभागाने अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार आणि पत्नी सुमित्रा पवार यांची मालमत्ता जप्त केली होती. बेहिशोबी संपत्ती आणि करचुकवेगिरीच्या आरोपांवरून आयकर विभागाने ही कारवाई केली होती. त्यातून जवळपास 1000 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. मात्र अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ही कारवाईच बारगळली असी चर्चा आहे. जप्त केलेली मालमत्ता अजित पवारांना परत देण्यात येणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - असाही योगायोग! वडिलांप्रमाणेच लेकांचाही विधानसभेत एकत्र प्रवेश
याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ते पहिल्यांदा म्हणाले की त्यावर जर निकाल आला असेल तर त्यावर काय भाष्य करणार असं ते म्हणाले. पण आधी सिंचन घोटाळ्यात क्लिनचिट नंतर बेहिशोबी मालमत्ता परत करण्याचा निर्णय कसा होतो. अजित पवारांवर तर पंतप्रधानांनीच आरोप केले होते. यावर बोलताना मात्र शरद पवार म्हणाले की ज्या लोकांनी हा निर्णय घेतला आहे. ज्यांनी त्यांना घेतले आहे त्यांनीच आता याबाबतचं स्वच्छ चित्र लोकांसमोर मांडले पाहीजे असं आव्हानच एक प्रकारे पवारांनी दिले आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
शरद पवार हे कोल्हापुरात होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान भाजप सरकारमध्ये पहिल्यावेळी गेल्यानंतर अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लिन चिट देण्यात आली होती. आता तर त्यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणीही दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनीही अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. शिवाय भाजपच्या वॉशिंग मशिनमधून अजित पवार स्वच्छ होवून बाहेर आले का असा प्रश्नही केला जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच
दरम्यान आपण मारकडवाडीला भेट देणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी आपण तिथल्या लोकां बरोबर संवाद साधणार आहोत. लोकांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर प्रचंड असंतोष आहे. अपेक्षित असलेला निकाल लागला नाही अशी त्यांची भावना आहे. महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असतानाही अनुकूल निकाल लागला नाही असं शरद पवार यावेळी म्हणाले. मतांची जी आकडेवारी आहे त्यात गडबड दिसते असंही ते म्हणाले.