वडिलांप्रमाणेच मुलांचाही प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश घडल्याचा अनोखा योगायोग घडून आलाय. 1990 साली महाराष्ट्रचे माजी गृहमंत्री राहिलेले आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला होता. अगदी तसेच दोघांचे चिरंजीव रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी आज प्रथमच आमदार बनून सोबत विधानसभेत प्रवेश केला. त्यामुळे एका अनोखा योगायोग पाहायला मिळाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1990 सालची एकप्रकारे पुनरावृत्ती झाली असे सध्या बोलले जातेय.तासगाव आणि खानापूर आटपाडी या शेजारी शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आर. आर. पाटील आणि अनिल बाबर हे दोघेही आज दुर्दैवाने हयात नाहीत. आर. आर. पाटील यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील तर अनिल बाबर यांचा राजकीय वारसा त्यांचे पुत्र सुहास बाबर हे चालवत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेचे अध्यक्षपद शिवसेना -राष्ट्रवादीला नाहीच? भाजपचा उमेदवारही ठरला?
आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यात ते दोघेही विजय झाले होते. तासगाव विधानसभा मतदारसंघातुन आर. आर. पाटील तर खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातुन अनिल बाबर यांनी निवडणूक लढवून प्रथमच आमदारकीची माळ गळ्यात घातली होती. त्यानंतर आर. आर. आणि अनिल बाबर यांनी 1990 साली एकत्रितच विधानभवनामध्ये प्रवेश केला होता.
ट्रेंडिंग बातमी - विरोधकांचा आमदारकीची शपथ घेण्यास नकार का? पहिल्याच दिवशी पेच
आज पण त्यांचेच वारसदार असलेले नवनिर्वाचित आमदार रोहित पाटील व आमदार सुहास बाबर यांनी एकत्रित विधानभवनात प्रवेश केला. या दोघांच्या एकत्रित आगमनानंतर आर. आर. पाटील आणि अनिल बाबर यांची जोडी पुन्हा एकप्रकारे एकत्र आल्याची भावना अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलून दाखवली. रोहित पाटील हे तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आलेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world