राष्ट्रवादी काँग्रेस (राशप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारने झेड प्लस दर्जाची सुरक्षा देवू केली आहे. त्यामुळे शरद पवारां भोवती 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांचे सुरक्षा कडे असणार आहे. या सुरक्षे वरून आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ही सुरक्षा दिली असावी असा संशय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तर पवारांना कोणापासून धोका आहे असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला. राज्यातल्या पोलीसांवर केंद्राचा विश्वास नसावा म्हणून ही सुरक्षा दिली आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मात्र या पेक्षा वेगळी माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शरद पवारांना सुरक्षा का दिली याबाबत वेगवेगळे आंदाज बांधले गेले. मात्र या सुरक्षेबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्राने आताच सुरक्षा का दिली याबाबत आपण काही बोलणार नाही. राज्यात अनेक वर्षापासून आपल्याला सुरक्षा पुरवली जात आहे. केंद्राने सुरक्षा दिल्याचा निर्णय काही अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पवार म्हणाले. देशात तीन लोकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट
त्यात मी, आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि अमित शहा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे काही माहिती आहे, त्यामुळे सुरक्षा वाढवत असल्याचे सांगितले. पण त्यांच्याकडची माहिती काय आहे हे त्यांनी सांगितले नाही. याबाबत आपण केंद्रातील गृहखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलू असेही पवार यावेळी म्हणाले.
झेड प्लस भारतातील सर्वोच्च सुरक्षा कॅटेगरी आहे. या सुरक्षा कव्हरमध्ये सीआरपीएफचे दहा जवान, एनएसजी कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. यात एकूण 55 सुरक्षा कर्मचारी असतात. या कव्हरमध्ये सामील कमांडोंनी मार्शल आर्टचं प्रशिक्षण घेतलेलं असतं. झेड प्लस सिक्युरिटी कव्हरमध्ये तैनात जवानांकडे आधुनिक हत्यारं असतात. पंतप्रदान आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह VVIP व्यक्तींनी ही सुरक्षा दिली जाते.