Sharad Pawar: सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर अन् विषयच संपवला

राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला होता. याबाबत ही त्यांना विचारण्यात आले.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार दिला नाही
  • शरद पवारांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार नाही असं स्पष्ट केलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरल्या आहेत. या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार मैदानात उतरवला नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवारांना सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आमचा उमेदवार निवडणूक लढवत नाही. मग प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठे असं सांगत त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र या निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शरद पवारांनी आज राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणुकीबाबत काही व्यक्तव्य केली आहेत. 

काँग्रेसने बारामतीत आपला उमेदवार उतरवला आहे. याबाबत ही शरद पवारांनी आपली भूमीका मांडली. त्यांनी काँग्रेसच्या भूमीकेचे समर्थन केले आहे. काँग्रेसने उमेदवार देणे हे काही चुकीचे नाही. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. निवडणूक लढणे हे राजकीय पक्षाचा अधिकार आहे. त्यामुळे त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. शिवाय निवडणूक बिनविरोध झाली पाहीजे ही मागणी करण्याचं ही काम नाही असं ही ते म्हणाले. निवडणूक होणार आहे हे समजूनच निवडणूक लढायची असते असं ही ते म्हणाले. त्याची तयारी करणे गरजेचे असते असं ही त्यांनी सांगितलं. असं वक्तव्य करत बिनविरोध निवडणुकीची शक्यता ही त्यांनी फेटाळून लावली. 

Advertisement

नक्की वाचा - Sunetra Pawar: 'माझ दुःख तळघरात कोंडलं', सुनेत्रा पवारांचा कंठ दाठला, शरद पवारांचे नाव घेत मोठं आवाहन

सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? या प्रश्नाला पवारांनी आपल्या स्टाईलने उत्तर दिले. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आताच्याच उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्या आता त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. शिवाय आम्ही उमेदवार दिला नाही. जर आमच्या पक्षाने उमेदवार दिलाच नाही तर प्रचार करण्याचा प्रश्न येतो कुठे असा प्रतिप्रश्न पवारांनी यावेळी केला. राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आला होता. याबाबत ही त्यांना विचारण्यात आले. ते म्हणाले जर त्यांनी माझा फोटो लावला असेल तर ते चुकीचे आहे. मोदी अमित शहा यांचे फोटो लावले असतील तर त्यात चुकीचे नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं.  

नक्की वाचा - Pune News: भिवगवण अपहरण प्रकरणात ट्वीस्ट! पिडीताने जबाब बदलला, म्हणाली लहान असतानाच त्याने माझ्यावर....

अजित पवार यांच्या जाण्याचे दुख: संपूर्ण पवार कुटुंबाला आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. ती आपण पार पाडत आहे. संपूर्ण कुटुंब एक आहे असं ही ते म्हणाले. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल पक्ष बळकावत आहे असा प्रश्न ही त्यांना करण्यात आला. याबाबत त्यांनाच विचार ही त्यांच्या पक्षाची स्थिती आहे असं पवार यावेळी म्हणाले. हा निष्कर्ष त्यांचा पक्ष काढत आहे. त्यामुळे तेच स्पष्टीकरण देतील असं ही त्यांनी सांगितलं. पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार ही पवारांनी घेतला. राजकारणात परिपक्वता असावी लागते. ती पार्थमध्ये आहे की नाही माहित नाही असं ते म्हणाले.   

नक्की वाचा - Video: 14 फुट लांब, 55 किलो वजन, महाकाय अजगर पाहून अंगाचा थरकाप, 9 जण सरसावले पण पुढे...

यावेळी राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाबाबत ही शरद पवारांनी वक्तव्य केले. ते म्हणाले की विलिनिकरणाची चर्चा ही आमच्याकडून जयंत पाटील करत होते. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात ही चर्चा सुरू होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा थांबली. आता कुठली ही चर्चा सुरू नाही. शिवाय पक्षात ही विलिनिकरणाची कोणती ही चर्चा झालेली नाही. पुढे काय होईल हे आताच सांगता येत नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र विलिनिकरणाची चर्चा सुरू होती याला त्यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान शरद पवारांनी 14 व्या वेळी कोणत्या ना कोणत्या सभागृहाचा सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळची शपथ आपल्यासाठी वेगळी असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक वेळी आपण चालत येवून शपथ घेत होतो. यावेळी पहिल्यांदाच व्हिलचेअरवर आपल्याला यावं लागले असं ते म्हणाले.