भर पावसात शरद पवारांचे आंदोलन, कार्यकर्त्यांना दिली शपथ

आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यावेळी शरद पवारांनी भिजत आंदोलन सुरूच ठेवले.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

बदलापूर प्रकरणा विरोधात महाविकास आघाडीने राज्यभरात मुक आंदोलन केले. यावेळी पुण्यात शरद पवारही या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी त्यांच्या बरोबर सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही होते. आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. त्यावेळी शरद पवारांनी भिजत आंदोलन सुरूच ठेवले. त्यांच्या बरोबर खासदार सुप्रिया सुळे, आमदार रविंद्र धंगेकर हे ही भित आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी शरद पवारांनी उपस्थित कार्यकर्त्यांना महिलांचा सन्मान आणि संरक्षण करण्याची शपथ दिली. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आंदोलना दरम्यान शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. एक अस्वस्थ करणारा हा प्रसंग आहे. बदलापूरला जो चिमुकल्या मुलींवर  अत्याचार झाला, त्याने सबंध देशात राज्याची नाचक्की झाली.राज्याच्या नावलौकीकाला धक्का बसला असे शरद पवार यावेळी म्हणाले. ज्या सरकारची या गोष्टी रोखणे ही जाबाबदारी आहे त्यांना त्याची जाण राहीली नाही. या घटनेनंतरही कुठेना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा घटनां विरोधात आवाज उठवला तर त्याला राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी राजकारण आहे असं म्हणलात. त्यांचे हे वक्तव्य त्यांची मानसिकता दर्शवते. शिवाय हे वक्तव्य म्हणजे चमत्कारीक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 3 वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह 15 दिवसापूर्वी जंगलात पुरला, अंगावर काटा आणणारी घटना

या वेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांना महिलांच्या रक्षणाची आणि सन्मानाची शपथ दिली. शपथ देताना ते म्हणाले,  मी अशी शपथ  घेतो की स्त्रीयांवर होणार हिंसाचार कधीही खपवून घेणार नाही. माझे घर, माझे गाव, माझे कार्यालय, कोणत्याही ठिकाणी महिलांवर छेडछाड किंवा अत्याचार होत असेल तर त्यास विरोध करून त्या विरुद्धचा आवाज उठवीन. मी मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कधी करणार नाही. महिलांचा सन्मान राखीन. महाराष्ट्रात आणि देशात महिलांसाठी अधिकाधिक सुरक्षित भयमुक्त स्थिती बनवण्यासाठी प्रयत्न करेन. अशी शपथ शरद पवारांनी सर्वांना यावेळी दिली.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - आधी बदलापुरात सहानुभूती मग उल्हासनगरात जाऊन हातावर मेहंदी, चाकणकरांचं चाललंय काय?

शरद पवार यांच्या प्रमाणे सुप्रिया सुळे यांनीही भिजत आंदोलनात सहभाग नोंदवला. गेल्या पंधरा दिवसात अनेक घटना घडल्या आहेत. पोलीसांनी वेळेवर नोंद घेतली नाही. वर्दीची भिती कोणालाही राहीले नाही, असा आरोप यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला.  हे सरकार असंवेदनशील आहे. असं ही त्या म्हणाल्या. बदलापूरमध्ये आंदोलन करणारे स्थानिक होते.  ते लेकीसाठी लढत होते. त्याला सरकारचे प्रमुख बाहेरून आलेले लोक असं म्हणत होते. हे राजकीय आंदोलन आहे असं सांगत होते. त्यामुळे सरकारचा विचार कसा हे समजते, असा हल्लोबोल त्यांनी केला. या सरकारला कोणत्याही विषयाचं गांभिर्य राहीले नाही असं ही त्या म्हणाल्या. 

Advertisement