जाहिरात

Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता

शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना हृदयाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. 

Tanaji Sawant : शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल; अँजिओप्लास्टी होण्याची शक्यता

Tanaji Sawant : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant in ICU)  यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांना हृदयाचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. शनिवारी सायंकाळी त्यांना रूबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयात तीव्र वेदना होत असल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

तातडीने औषधोपचार केल्याने सावंत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र आजाराची तीव्रता लक्षात घेऊन रविवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची माहिती रूबी हॉल क्लिनिकमधील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com