शिंदेंची पहिली यादी आली, पण बंडा वेळी साथ देणाऱ्या 'त्या' आमदारांना का ठेवले वेटींगवर?

विद्यमान आमदारांना मात्र पहिल्या यादीत जागा मिळू शकलेली नाही. त्यांना उमेदवारी जाहीर न करता वेटींगवर ठेवल्याची चर्चा आता होत आहे. शिवाय बंडामध्ये साथ देवूनही उमेदवारी का नाही असा प्रश्न आता त्या आमदारांचे समर्थक विचारत आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी देण्यात आली. या यादीत शिंदेंच्या बंडा वेळी साथ देणाऱ्या सर्व आमदारांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आले आहे. मात्र त्याला तीन नावं मात्र अपवाद ठरले आहे. या विद्यमान आमदारांना मात्र पहिल्या यादीत जागा मिळू शकलेली नाही. त्यांना उमेदवारी जाहीर न करता वेटींगवर ठेवल्याची चर्चा आता होत आहे. शिवाय बंडामध्ये साथ देवूनही उमेदवारी का नाही असा प्रश्न आता त्या आमदारांचे समर्थक विचारत आहे. मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांनी झाकली मुठ सव्वालाखाची अशी भूमीका घेतली आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एकनाथ शिंदे यांनी शिवसेने बंड केले. आमदारांना घेवून ते सुरतला पोहोचले. त्यावेळी त्यांना ज्या आमदारांनी साथ दिली त्यात भरत गोगावलें पासून अगदी संजय शिरसाट यांच्या पर्यंत जवळपास चाळीत ते पंचेचाळीस आमदार होते. यातील बहुतांश सर्व आमदारांना पहिल्या यादीत उमेदवारी देण्यात आली. पण त्याल तीन आमदार हे अपवाद ठरले आहे. त्यात  अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांचा समावेश होता. हे सर्व आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे. ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. त्यामुळे यांना उमेदवारी न दिल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे. 

ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?

बालाजी किणीकर हे अंबरनाथ विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. सलग तीन वेळा त्यांनी या मतदार संघातून विजय मिळवला आहे. किणीकर यांनी शिंदेंनी बंड केल्यानंतर त्यांना साथ दिली होती. ठाकरें ऐवजी ते शिंदेकडे गेले होते. त्यामुळे त्याचे फळ आपल्याला मिळेल अशी आशा किणीकर यांना होता. पण प्रत्यक्षात पहिल्या यादीत त्यांना स्थान न मिळाल्यामुळे त्यांना धक्का बसला आहे. या मतदार संघात किणीकर यांना पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात विरोध आहे. शहर अध्यक्ष अरविंद वाळेकर यांचा किणीकर यांना विरोध आहे. वाळेकर यांची मतदार संघात चांगली ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून शिंदेना चालणार नाही. त्यामुळे किणीकर यांची उमेदवारी होल्डवर ठेवण्यात आली आहे. ऐन वेळी वेगळ्याच चेहऱ्याला इथे मैदानात उतरवण्याची चर्चा आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : शिंदे गटाच्या उमेदवार यादीतून दिसतेय घराणेशाही? या सहा नेत्यांच्या नातेवाईकांना संधी   

अंबरनाथ प्रमाणेच या कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनाही उमेदवारी जाहीर झाली नाही. कल्याण पश्चिमेतून शिवसेना शिंदे गटाकडून अनेक जण इच्छुक आहे. माजी नगरसेवकांसह माजी सभागृह नेता रवी यांनीही मतदार संघात तयारी सुरू केली आहे. ऐवढेच नाही तर माजी आमदार आणि भाजप नेते नरेंद्र पवार यांनीही या मतदार संघावर दावा केला आहे. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे इथे होणारी संभाव्य बंडखोरी लक्षात घेता शिंदे गटाने सावध भूमीका घेतली आहे. अशी चर्चा आता मतदार संघात रंगू लागली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वारे वा निवडणूक ! 2 दिवसात 4 पक्षात प्रवेश करणारा उपसरपंच, त्यांनी असं का केलं?

अंबरनाथ, कल्याण पश्चिम प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील तिसरा मतदार संघ म्हणजे भिवंडी ग्रामीण. इथलाही उमेदवाराची घोषणा पहिल्या यादीत करण्यात आली नाही. या मतदार संघातून शिवसेनेचे शांताराम मोरे हे सलग दोन वेळा आमदार झाले आहेत. शिंदेंच्या बंडानंतर मोरे यांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळेल अशी आशा होता. मात्र त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळू शकले नाही. आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळेल अशी आशा त्यांना होती. पण त्यांच्या नशिबी आता प्रतिक्षा आली आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत तरी आपल्याला उमेदवारी मिळते का? याची वाट पाहावी लागणार आहे.