महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याचे कारणही तसेच होते. राज यांचे पुत्र अमित निवडणूक मैदानात उतरणार की नाही याबाबत उत्सुकता होती. त्यामुळे अपेक्षे प्रमाणे अमित ठाकरे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यांना माहिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं आहे. राज यांनी हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेतला आहे. या मतदार संघाचा इतिहास पाहिल्यास काही गोष्टी या अमित ठाकरेंच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित यांचा विधानसभेत पोहचण्याचा मार्ग सुकर होवू शकतो. त्यामुळे आदित्य ठाकरे नंतर अमित ठाकरे हे दुसरे ठाकरे विधानसभेत दिसू शकतात. मात्र अशी कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे राज यांनी अमित ठाकरे यांना माहिम मधुन उमेदवारी दिली? याची चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या मतदार संघाचा इतिहास पाहाता हा निर्णय योग्य ठरण्याचीच अधिक शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माहिम विधानसभा मतदार संघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला समजला गेला आहे. या मतदार संघात सध्या सदा सरवणकर हे आमदार आहेत. ते शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून आले होते. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी ठाकरें ऐवजी एकनाथ शिंदे यांनी साथ दिली. त्यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे.सदा सरवणकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाले होते. विशेष म्हणजे यावेळी शिंदे गट आणि मनसे एकत्र होते. तरी ही ठाकरेंच्या सेनेला मताधिक्य मिळाले होते. हा मतदार संघ 1990 पासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र 2009 ची निवडणूक त्यासाठी अपवाद आहे.
ट्रेंडिंग बातमी - MNS List : विधानसभा निवडणुकीत आणखी एक ठाकरे! अमित ठाकरे 'या' मतदारसंघातून मैदानात
2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे उमेदवारी कापली होती. त्यांच्या ऐवजी आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होती. त्यावेळी मनसेने नितीन सरदेसाई यांना उमेदवारी दिली होती. या मतदार संघात तिरंगी लढत झाली होती. शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली. याचा थेट फायदा मनसेला झाला होता. हा इतिहास आहे. सध्याची स्थिती फार वेगळी नाही. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. सदा सरवणकर हे मैदानात आहेत. शिवसेना ठाकरे गटाने अजून आपला उमेदवारी जाहीर केलेला नाही. त्यांचा उमेदवार मैदानात असेल तर इथे तिरंगी लढत होणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत वाद असलेले 'हे' आहेत 'ते' मतदार संघ
मनसेला मानणारा एकसंध मतदार या मतदार संघात आहे. मागील तीन निवडणूका पाहील्या तर मनसेला मानणारी सरासरी चाळीस हजार मते या मतदार संघात आहेत. शिवाय तेवढीच मते ही शिवसेनेची आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या मतात आता विभागणी होणार हे निश्चित आहेत. याचा फायदा अमित ठाकरे यांना होवू शकतो. याच गणिताचा विचार राज ठाकरे यांनी केला आहे. त्यामुळेच त्यांनी थेट अमित यांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत मनसेने या मतदार संघात शिवसेनेला कडवी टक्कर दिली होती. त्यामुळे यावेळची सदा सरवणकर यांच्यासाठीची निवडणूक सोपी असणार नाही.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
मात्र 2009 साली या मतदार संघात शिवसेनेच्या मतांची विभागणी झाली होती. त्याचा फायदा मनसेला झाला. तिच स्थिती यावेळी आहे. शिवाय भाजपचे मतदार नेमके कोणाच्या पारड्यात मतं टाकतात हे ही निर्णायक ठरणार आहे. अमित ठाकरे यांची पाटी कोरी आहे. त्यामुळे नवा चेहरा शिवाय ठाकरे घराण्यातील चेहरा त्यामुळे दादर माहिम मधून एकगठ्ठा मतदार होण्याचीही दाट शक्यता आहे. जोडीला राज यांचा करिश्मा आहे. त्यामुळे दादर माहिम हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी राज यांनी हुकूमाचा एक्का टाकला आहे. हे करत असताना नितीन सरदेसाई यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. तर संदिप देशपांडे यांना वरळीतून निवडणूक लढण्यास सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांना या मतदार संघातून निवडणूक लढवताना कडवी टक्कर दिली होती. त्यात ठाकरे गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते यावरही या मतदार संघाचा निकाल अवलंबून असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world