उद्धव ठाकरेंच्या सभेआधी मनसेचा राडा, ठाकरेंवर बांगड्या फेकल्या, दगडही फेकले

उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या.

जाहिरात
Read Time: 1 min
ठाणे:

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज ठाण्यात मेळावा होता. त्या मेळाव्याला ते येणार होते. ते ज्यावेळी मेळाव्यासाठी गडकरी रंगायतन इथे पोहोचले, त्याच वेळी मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यावेळी रोखले. यावेळी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार गोंधळ झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी बीडमध्ये राज ठाकरे यांच्या गाडी समोर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या होत्या. शिवाय त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधातही असेच काही तरी होणार अशी शक्यता होती. तसा इशाराही मनसे नेत्यांनी दिला होता. त्यानुसार ठाण्यात शिवसेना आणि मनसेमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक

ठाण्यात उद्धव ठाकरें विरोधात मनसैनिकांनी राडा केला. याबाबत आपल्याला कल्पना नसल्याचे यावेळी मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सांगितले. मात्र बीडमध्ये जी अँक्शन झाली त्याची रिअँक्शन ठाण्यात झाली असे ते म्हणाले. आमच्या नेत्याच्या गाडीवर जर सुपाऱ्या फेकणारा असाल तर अशा घटना ह्या होणारच असेही ते म्हणाले. स्त होता पण तरीही गोंधळ झाला.  

Advertisement
Topics mentioned in this article