जाहिरात

अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक

Raj Thackeray on Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फरक सांगितला आहे.

अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक
Raj Thackeray Ajit Pawar
छत्रपती संभाजीनगर:

Raj Thackeray on Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांसारखा माणूस म्हणतो महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल, या लोकांनी मणिपूर होऊ नये यासाठी चिंता केली पाहीजे. तर हीच माणसे असे म्हणत आहे. यावरून त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे तुमच्या लक्षात येईल, अशी टीका राज यांनी केली. शरद पवार यांच्यावर टिका करत असतानाच राज यांनी त्यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रशस्तीपत्रक दिलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले राज ठाकरे?

'पुढच्या तीन साडेतीन महिन्यात यांना जेवढ्या दंगली घडवता येतील, त्या घडवण्यासाठी यांचे प्रयत्न सुरू आहे. जेम्स लेन प्रकरणापासून शरद पवारांनी हे राजकारण सुरू केले आहे.जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्षे आहे, फक्त महाराष्ट्रात नाही तर देशात आहे. दुसऱ्याच्या  जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस निर्माण केली तेव्हापासून सुरू झालं.  

माझ्या दौऱ्यादरम्यान या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, उद्या माझे मोहोळ उठले तर यांना निवडणुकीला एकही सभाही घेता येणार नाही. त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये. यांच्याकडे जर प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहे. त्यांनी माझ्या नादी लागू नये. समाजात तेढ निर्माण करून, विष कालवून यांना कसले राजकारण करायचे आहे?' असा सवाल राज यांनी केला.

( नक्की वाचा : 'मराठवाड्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न', राज ठाकरेंचा गंभीर आरोप! पवार, उद्धव यांना सुनावलं )
 

अजित पवारांना प्रशस्तीपत्रक

अजित पवार कधीही जातीच्या राजकारणात पडले नाही, हे निश्चित. माझे त्यांच्यासोबत कितीही मतभेद असतील, पण ते कधीही या भानगडीत पडले नाहीत, अस प्रशस्तीपत्रक राज यांनी यावेळी दिलं. 

'पवार-उद्धव यांनी गैरसमज करु नये'

राज यांनी या पत्रकार परिषदेत शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनाही सुनावलं. राज म्हणाले की, ' शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी हे समजून घेतलं पाहिजे की,  त्यांना झालेले मतदान हे मोदींच्या विरोधातून झालेले मतदान आहे. त्यांच्या प्रेमाखातर झालेले हे मतदान नव्हतं,  शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी आमच्या पोरांनी मार मार मारला, नशीब पोलीस मध्ये पडले. तो ओरडत गेला 'एक मराठा लाख मराठा' म्हणजे काय ? त्यांना दाखवायचं होतं की हे जरांगे पाटील यांचे आहे, मात्र त्यांच्या आढून यांचे विधानसभेचे राजकारण सुरू आहे हे लोकांना दाखवायचे आहे,' असा आरोप त्यांनी केला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
"शिंदेजी, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं...", जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमित शाहांचं मोठं वक्तव्य : सूत्र
अजित पवार 'तसे' नाहीत, राज ठाकरेंनी सांगितला नेमका फरक
vijay wadettiwar on supriya sule Chief minister banner in baramati political news
Next Article
सुप्रिया सुळेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; वडेट्टीवारांनी सांगितलं मुख्यमंत्री कुणाचा होणार