शिवसेनेचे जेष्ठ नेते सतीश प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून प्रधान यांची ओळख होती. ठाण्यात शिवसेना वाढवण्यात सतिश प्रधान यांचा मोठा वाटा होता. ठाणे नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान सतीश प्रधान यांनाच मिळाला होती. शिवाय ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तेच झाले होते. आज रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे वृद्धापकाळाने ठाण्यातल्या निवास्थानी निधन झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सतीश प्रधान यांची मोलाची भूमिका होती. ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे. त्यांनी ठाण्याचे नगराध्यक्षपदा बरोबरच महापौरपदही भूषवले होते. त्यानंतर त्यांची राज्यसभेवरही नियुक्ती करण्यात आली होती.
राज्यसभेवर ते दोन वेळा निवडून गेले होते. त्यावेळी त्यांनी संसदेच्या विवीध समित्यांवर काम केले होते. ठाण्याची नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. ठाण्याच्या जडणघडणीमध्ये प्रधान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार इथे झाला होता. पण त्यांची कर्मभूमी ही ठाणेच होती. ते संसदेत शिवसेनेचे गटनेते ही होते.
ट्रेंडिंग बातमी - Tourism News: महाबळेश्वर, लोणावळ्या बरोबर 'हे' थंड हवेचे ठिकाणी झालं हाऊसफुल पण...
त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यासोबत देखील त्यांनी भरपूर काम केले होते. ठाणे शहरांमध्ये तसेच जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी वेगवेगळ्या क्रिडा क्षेत्रातील समित्यांवरही काम केलं होतं. शिवसेनेच्या जुन्या नेत्यां पैकी एक म्हणूनही त्यांची ओळख होती.