जाहिरात

Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या हाती काय लागलं? तपासाला आला वेग

या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच दिले आहेत.

Santosh Deshmukh Murder:संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या हाती काय लागलं? तपासाला आला वेग
बीड:

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. बीडमध्ये तर आक्रोश मोर्चाही काढण्यात आला. त्या मोर्चाला जमलेला जनसमुदाय पाहाता पोलिस आणि सरकारवरील दबावही वाढत चालला आहे. हे प्रकरणाचा तपास आता CID कडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानं सीआयडी अॅक्शन मोडवर आली आहे. सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत. देशमुख यांच्या हत्येला वीस दिवस झाले तरी त्यांचे मारेकरी अजून मोकाट आहेत. त्यांना पकडण्याचा दबाव पोलिसांवर आहे. अशी स्थितीत सीआयडीने तपासाच्या दृष्टीने महत्वाची पावलं टाकली आहेत.         

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर त्या तपासाला वेग आला आहे. या खून प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी सीआयडीकडून सध्या दररोज कसून चौकशी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत 100 जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून महत्वाची माहिती सीआयडीला मिळाल्याचे समजत आहे. काही प्रश्न या चौकशी दरम्यान सीआयडीने केले. त्यातून त्यांच्या हाती महत्वाची माहिती मिळाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  बीड हत्याकांड प्रकरणी CM फडणवीसांचे मोठे आदेश, फरार आरोपींना दणका; 'ते' फोटोशूटही भोवणार

चौकशीचे हे सत्र सीआयडीने सुरूच ठेवले आहे. सीआयडी चौकशीत कोण कसुर ठेवण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे सीआयडीचे वरिष्ठ अधिकारीही बीडमध्ये तळ ठोकून आहेत. आतापर्यंत शंभर जणांची चौकशी या प्रकरणी झाली आहे. आजही सीआयडीने पाच ते सहा जणांना या प्रकरणा चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी सीआयडी प्रयत्नशील आहे. ज्या शंभर जणांची चौकशी करण्यात आली आहे. त्या आधारे या सहा जणांचीही चौकशी केली जात आहे. त्यातून सीआयडीच्या हाती काही तरी नक्की लागेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: बीड हत्या प्रकरण! पोलिसांकडून अंजली दमानियांना नोटीस; रुपाली ठोंबरेंवरही गुन्हा दाखल

संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील तीन प्रमुख आरोपी अजूनही फरार आहे. त्यांचा कोणताही पत्ता अजूनही पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे हा तपास पोलिसांकडून काढून घेण्यात आला. आता सीआयडी याचा तपास करत आहे. त्यात वाल्मिक कराडला शोधण्याचा मोठा दबाव सीआयडीवर आहे. त्यामुळे सीआयडी ज्या वेगाने या प्रकरणाचा तपास करत आहे हे पाहात ते किती लवकर या आरोपींना अटक करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  प्राजक्ताच्या मदतीला गौतमी पाटील धावली! सुरेश धस यांच्या वक्तव्यावर थेट बोलली; ट्रोलर्सना फटकारले

दरम्यान या प्रकरणातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच दिले आहेत. शिवाय वाल्मिक कराडच्या कुटुंबीयांची ही चौकशी केली गेली आहे. त्याच वेळी बीड इथे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला यासाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आला होता. यावेळी सर्वांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली होती. शिवाय धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणीही करण्यात आली होती. मुंडे यांच्या विरोधात सध्या स्वपक्षियां बरोबरच विरोधातील आमदारही एकवटले आहेत.    

Listen to the latest songs, only on JioSaavn.com