जाहिरात

Tourism News: महाबळेश्वर, लोणावळ्या बरोबर 'हे' थंड हवेचे ठिकाणी झालं हाऊसफुल पण...

काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. याचा पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला.

Tourism News:  महाबळेश्वर, लोणावळ्या बरोबर 'हे' थंड हवेचे ठिकाणी झालं हाऊसफुल पण...
मुंबई:

नववर्षाचं स्वागत त्याचबरोबर शनिवार आणि रविवार अशा लागून आलेल्या सुट्ट्या पहात पर्यटन स्थळावरील गर्दी वाढत चालली आहे. महाबळेश्वर आणि लोणावळ्यात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक आधीच पोहचले आहेत. अशा वेळी मुंबई आणि पुण्याच्या जवळ असं एक पर्यटन आहे जिथं पर्यटकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दी इतकी की इथली दळवणळण व्यवस्थाच काही काळासाठी बिघडली. जवळपास अडीच किलोमिटरच्या गाड्यांच्या रांगा त्यामुळे लागलेल्या पहायला मिळाल्या. शेवटी पर्यटकांना चालत चालत इच्छीत स्थळी पोहोचावं लागलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हे पर्यटनस्थळ आहे रायगड जिल्ह्यातील माथेरान. माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यटकांची वाढलेली संख्या त्यामुळे वाढलेल्या गाड्या यांचा ताण माथेरानच्या पार्कींग व्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे इथल्या पार्कींगचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहन पार्किंग फुल झाल्याने विकेंडला माथेरानला  घाटात तब्बल अडीच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही काळ येथील वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. याचा पर्यटकांना चांगलाच मनस्ताप भोगावा लागला. दरम्यान पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर काही तासात ही वाहतूक कोंडी फोडली. वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी वाहनातून उतरून पायी चालणे पसंद केले. 31 डिसेंबर जवळ आल्याने पर्यटकांचा लोंढा माथेरानच्या दिशेने वळलेला दिसला. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या हाती काय लागलं? तपासाला आला वेग

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरानची ओळख आहे. विकेंडला माथेरानला येणार्‍या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असते. अशातच 2024 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि येणाऱ्या 2025 वर्षाच्या स्वागतासाठी माथेरानला पर्यटक मौज मजा करण्यासाठी आले होते. छोटे हिल स्टेशन म्हणून आणि मुंबई पुणे या शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले हे ठिकाण म्हणून सर्वाधिक पसंती पर्यटक माथेरानला देतात. परंतु माथेरान फिरण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना गेली कित्येक वर्षे वाहन पार्कींगच्या समस्याला तोंड द्यावे लागत आहे. येथील अपुरी वाहन पार्किंग व्यवस्था येणार्‍या पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

ट्रेंडिंग बातमी -  बीड हत्याकांड प्रकरणी CM फडणवीसांचे मोठे आदेश, फरार आरोपींना दणका; 'ते' फोटोशूटही भोवणार

पर्यटकांची वाढती संख्या पाहाता पार्किंगचा प्रश्न लवकर सोडवला जावा अशी मागणी केली जात आहे. पुढील दोन दिवस आणखी पर्यटक माथेरानला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंगवर आणखी ताण येण्याची शक्यता आहे. एका दिवसात माथेरानमध्ये 12 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. त्यामुळे माथेरान घाट तर नेरळ परीसरात देखील पर्यटकांच्या वाहनांची गर्दी पाहायला मिळाली आहे. शिवाय कर्जत कल्याण राज्यमार्गावर वाहनांची रांगा दिसून येत आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com